भय्यू महाराजांच्या आईंनी केला धक्कादायक खुलासा

इंदूर : वृत्तसंस्था – भय्यू महाराज यांच्या आत्महत्येच्या ६ महिन्यानंतर त्यांच्या आईने एक धक्कादायक खुलासा आहे. ड्रायव्हर कैलाश पाटीलने ज्या व्यक्तींवर आरोप केले त्या सगळ्या व्यक्तींवर त्यांच्या आईने देखील आरोप केल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना भय्यू महाराज यांच्या ७५ वर्षांच्या आई कुमुदनी देशमुख म्हणाल्या, “ती युवती भय्यूकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू घरात राज्य करायला लागली. ती भय्यूच्या बेडरुममध्येच असायची. कपाटात कपडे ठेवायची. त्याच्याच बाथरुममध्ये अंघोळ करायची. विनायक आणि शेखर देखील तिच्यासोबत या षडयंत्रात सहभागी आहेत. त्यांनी भय्यूला फसवलं आणि ब्लॅकमेल केलंहा खुलासा केला आहे.”

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘त्या तरुणीनेच भय्यू महाराजांना मारलं आहे असा आरोप  भय्यू महाराजांच्या आईने केला आहे. याबाबत बोलताना त्यांच्या आई म्हणाल्या की, “एकदा भय्यू साधनेसाठी गेला होता. शेखरने त्या मुलीचा उल्लेख केला आणि मला सांगितलं की, महाराज तर त्या तरुणीसोबत फिराय़ला गेले आहेत. तेव्हा मी त्याच्यावर ओरडली तर त्याने मला उलट उत्तर दिलं. तेव्हापासून त्याने माझ्याकडे येणं-जाणं बंदच केलं.”

एकटा पाहताच करायचे तरुणीला फोन

भय्यू महाराजांच्या आईने म्हटलं की, ‘शेखर आणि विनायक भय्यू एकटा असला की लगेच त्या मुलीला फोन करायचे. भय्यू अंघोळ करत असताना देखील जबरदस्ती त्याच्याकडे फोन द्यायचे.’

या प्रकरणाबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता

भय्यू महाराज मृत्यूप्रकरणाबाबत ब्लॅकमेलिंगचा मोठा संशय पोलिसांना आहे.  त्याबाबत काही नवी माहिती उघड होण्याचीही शक्यता आहे. या प्रकरणाबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाबाबत भय्यू महाराजांना अश्लील व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप असलेल्या तरूणीची अनेक तास चौकशी करण्यात आली. परंतु  भय्यू महाराजांना धमकावण्यात आल्याचे आरोप तरूणीने फेटाळले आहेत. तीन दिवसांपासून विनायकसह अन्य कर्मचाऱ्यांचीही चौकशी कऱण्यात आली. या सर्व प्रकरणात विनायककडून बहुतांश माहिती मिळेल अशी पोलिसांना आशा आहे. मुख्य म्हणजे  पोलिसांनी अजूनपर्यंत २० जणांचा जबाब नोंदवला आहे.