Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण ! ‘पलक’चं लग्नासाठी ब्लॅकमेलिंग ते 2 सेवकांचा ‘दगा’, दोषींना 6 वर्ष कारावासाची शिक्षा

इंदूर : वृत्तसंस्था – दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात (Bhaiyyu Maharaj Suicide Case) आज (शुक्रवार) इंदौर येथील सेशन कोर्टात (Indore Session Court) अंतिम सुनावणी पार पडली. कोर्टाने भैयू महाराज आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दोन सेवक विनायक आणि चालक शरद यांना दोषी ठरवलं (Accuse Guilty) आहे. या दोघांसोबत पलक नावाच्या महिलेला देखील न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. पलकने भय्यू महाराज यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) बनवले होते, अशी माहिती समोर आली होती. अखेर तीनही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत सहा वर्षे कारावासाची शिक्षा (Imprisonment) सुनावली आहे. या तिघांनी भय्यू महाराज यांना आत्महत्येस (Bhaiyyu Maharaj Suicide Case) प्रवृत्त केल्याचे सिद्ध झाले आहे.

 

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी (Bhaiyyu Maharaj Suicide Case) इंदौरच्या सेशन कोर्टात जवळपास साडेतीन वर्षे सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी सेवादार शरद देशमुख (Sharad Deshmukh), विनायक दुधाळे (Vinayak Dudhale) आणि पलक पुराणिक (Palak Puranik) या तिघांनी पैशांसाठी भय्यू महाराजांना मानसिक त्रास दिल्याचे उघड झाले. आरोपी पैशांसाठी भय्यू महाराजांना ब्लॅकमेल (Blackmail) करत असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. ज्या सेवकांवर भय्यू महाराजांचा विश्वास होता, ज्यांच्यावर आपल्या आश्रम, कुटुंबाची जबाबदारी सोपवली त्याच सेवकांनी त्यांचा विश्वासघात केला. त्यानंतर पैशासाठी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केलं, असंही कोर्टात सिद्ध झालं.

 

या प्रकरणाची सुनावणी 19 जानेवारी रोजी झाली होती. ही सुनावणी साडेपाच तास चालली होती. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल 28 जानेवारी रोजी सुनावला जाईल असे सांगितले होते. त्यानंतर आज कोर्टात तीनही आरोपींना सहा वर्षे कारावासाची दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून (Shot Himself) आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार,आरोपी पलकने भय्यू महाराज यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ बनवले होते. ती या सेवकांच्या मार्फत त्यांना ब्लॅकमेल करत होती. तसेच तिने भय्यू महाराजांवर लग्नासाठी देखील दबाव टाकला होता. पण त्यांनी आयुषीसोबत लग्न केलं होतं.

 

संपत्तीसाठी मोठं षडयंत्र रचलं होतं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पलक पुराणिक, विनायक दुधाले आणि शरद देशमुख यांच्या ब्लॅकमेलिंगला वैतागून भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली. हे तीनही आरोपी महाराजांची संपत्ती (Property) हडपण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांनी मोठं षडयंत्र रचलं होतं. त्याच माध्यमातून त्यांनी भय्यू महाराज आणि पलक यांचे अनेक अश्लील फोटो बनवले होते. तेच फोटो दाखवून आरोपी त्यांना धमकावत होते. त्यामुळे भय्यू महाराज खचले आणि अखेर त्यांनी नैराश्यातून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

 

पलक मुलगी असल्याचे भासवायची
पलकने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करुन आश्रमाच्या तिजोरी आणि दानपेटीवर ताबा मिळवला होता.
तसेच तिने भय्यू महाराजांच्या घराच्या किल्ल्या देखील आपल्या ताब्यात घेतल्या होत्या.
ती सर्वांसमोर स्वत:ला महाराजांची मुलगी (Daughter) असल्याचे भासवत होती.
मात्र प्रत्यक्षात ती त्यांच्यासोबत प्रेयसी सारखी वागत होती.
ती आणि विनायक दर महिन्याला महाराजांकडून दीड लाख रुपये वसूल करत होते.

 

Web Title :- Bhaiyyu Maharaj Suicide Case | bhaiyyu maharaj suicide case accused sentenced to six years imprisonment

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा