भय्यू महाराजांची आत्महत्या नव्हे हत्या केली – रामदास आठवले 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्ये संदर्भात रोज नवीन राज  तपासातून पुढे येत चालले असताना आता या प्रकरणात रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली आहे असा संशय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी रामदास ठ्वले यांनी केली आहे. ते शुक्रवारी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.

सुरुवातीला भय्यू महाराजांनी आत्महत्या केली असे म्हणले जात होते परंतु त्यांच्या गाडी चालकाने त्यांच्या बद्दलची बरीच माहिती दिली त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्याने केला जाऊ लागला. तसेच भय्यू महाराजांच्या शिष्यांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी केली गेली पाहिजे असे म्हणले होते म्हणून आपण या संदर्भात मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याचे म्हणले होते त्यावर त्यांनी फोन करून आपल्या मागणीचा विचार करू असे म्हणले आहे असे रामदास आठवले म्हणले आहेत.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्ये संदर्भात तपास केला जावा हि मागणी घेऊन त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी अनेक वेळा पोलिसात गेल्या होत्या परंतु त्यांना याबाबत तपासात कसलीही प्रगती दिसत नव्हती. त्यानंतर भय्यू महाराज यांच्या गाडीचा चालक असलेल्या कैलास पाटील यांनी पोलिसांना अत्यंत महत्वाची माहिती दिली आणि या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्याने सुरु झाला. भय्यू महाराजांचा सेवक विनायक, शरद देशमुख आणि अन्य एका युवतीने मिळून भय्यू महाराजांना मारण्याचा कट शिजवला असल्याचा पोलीसांना संशय आहे त्याच दृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत.

काल पोलिसांनी भय्यू महाराजांच्या मुलीची सलग ५ तास चौकशी केली होती. भय्यू महाराजांच्या मुलीची काळजी घ्यायला संशयित युवतीला नेमले गेले होते असे सेवक विनायक याने पोलीसांना सांगितले होते परंतु भय्यू महाराजांच्या मुलीने सेवक विनायक खोटे बोलत असल्याचे म्हणले होते.