महापालिका आयुक्तपदी भालसिंग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नगर महापालिकेला आयुक्त मिळाले. औरंगाबाद महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची अहमदनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून आज नगरविकास विभागाने बदली केली आहे.

तब्बल वर्षभरापासून महानगरपालिका आयुक्त नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार होता. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही नगरला मनपा आयुक्त मिळत नव्हते. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत होता. आज नगरविकास विभागाने श्रीकृष्ण भालसिंग यांची आयुक्तपदी बदली केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे नाव नगरच्या आयुक्त पदासाठी चर्चेत होते. अखेर आज त्यांच्या नियुक्तीचा आदेश झाला आहे.