भामा आसखेड धरणाच्या पाण्यात शेतकरी बुडाला ; शोधकार्य सुरू

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

खेडच्या भामा आसखेड धरणात एक शेतकरी बुडाला आहे.ज्ञानेश्वर गुंजाळ असं त्यांचं नाव असून सकाळी साडे नऊ वाजता घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर हे धरणग्रस्त शेतकरी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.ते धरणात बुडाले की त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला हे अजून अस्पष्ट आहे.चाकण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

[amazon_link asins=’B07DCVDLVX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4091013e-b33a-11e8-8f23-0f025a49b6bf’]

मिळालेल्या माहितीनुसार,भामा आसखेड धरणाच्या पाण्यात शेतकरी बुडल्याची घटना आज शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे.ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ वय-३५ रा.रौनदळवाडी अस बुडालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

जाहीरात

ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ हे सकाळी भामा आसखेड धरणावर आले होते. त्यांनी तेथील धरणाच्या पाण्यात तोंड,हात,पाय धुतले आणि धरणाच्या पाण्यात थेट उडी घेतली आहे. मात्र त्यानंतर ते वर आलेच नाहीत.अशी माहिती तेथील काही प्रत्येक्षदर्शी महिलांनी पोलिसांना दिली आहे.त्यामुळे ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केली आहे की नाही हे अस्पष्ट आहे.ज्ञानेश्वर हे धरणग्रस्त शेतकरी असल्याची प्राथमिक समोर येत आहे.याप्रकरणी चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचा शोध घेत आहेत.

जाहीरात