Pune : शहराच्या पूर्व भागातील भामा-आसखेड ड्रीम प्रोजेक्ट पाणीपुरवठ्यासाठी सज्ज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    तब्बल सात वर्षाच्या प्रयत्नानंतर या प्रकल्पातील पाणीपुरवठ्याची चाचणी सध्या सुरू आहे. धरणातून पंपिंग केलेले पाणी शहराच्या पूर्व भागातील नळांना येत्या नववर्षात ( म्हणजे २०२१ ) च्या पहिल्याच आठवड्यात पाणी येणार आहे. पुणे शहराचा पूर्व भाग म्हणजे लोहगाव, कळस, धानोरी, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर, येरवडासह साधारणता ५८ चौरस किलोमीटरच्या शहरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. खडकवासला धरणातून यापूर्वी होणारा पाणीपुरवठा चार ठिकाणी पंपिंग होऊन या भागात पोहोचत होता. वीज पुरवठा खंडित झाल्यावर बंद होणारा पाणीपुरवठा, पाइपलाइनच्या समस्या, वाढती लोकसंख्या व पाण्याची कमतरता यामुळे शहराचा पूर्वभाग सतत पाणी समस्यांनी ग्रासला होता.

दरम्यान, संरक्षण,वन, जलसंपदासह विविध २२ खात्यांच्या परवानग्या आंदोलनाचा मागे लागलेला हा ससेमिरा व सात वर्षांचा कालावधी असे नाना अडथळे पार करत आज पुणे महापालिकेचा भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प पूर्णपणे प्रत्यक्षात साकार झाला आहे. वर्षानुवर्ष महापालिकेचे मुबलक पाणी नसल्याने ट्रॅक्टरची वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांना आता नवीन वर्षात चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. एकाच ठिकाणीपंपिग व सर्व वहन हे ग्रॅफिटी ने प्राप्त होणार आहेत. भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण झाल्याने शहराच्या पूर्व भागाला आपले हक्काचे २०० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.

महापालिकेतील शहर अभियंता प्रशांत वाघमारे, युवराज देशमुख, सुदेश कडू यांचा साधारणता दहा अभियंते व ४०० जणांची टीम या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सात वर्षे अहोरात्र कार्यरत राहिली. या काळात महापालिकेसह राज्यातही सत्तांतर झाले. तरी सर्वांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला पाठींबा दिला. प्रकल्प साकारताना स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, नानाविध कारणांमुळे या प्रकल्पाला अडचणी येत होत्या. पण या अडचणी येत असतानाही उर्वरित भागातील काम कसे पूर्ण होईल याकरिता महापालिकेच्या अभियंत्यांनी चंग बांधला. त्याचे फळ म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतात. अवघ्या काही दिवसात आज खेडगावतील तसेच केळगाव मधील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुरेशा पाण्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागणाऱ्या शहरातील पूर्व भागातील नागरिकांची तहान हा प्रकल्प भागवणार आहे.

ड्रीम प्रोजेक्ट पाणीपुरवठ्यासाठी सज्ज

जॅकवेलच्या खाली तीस मीटर खोल पाण्याखाली बोगदा साडे आठ किलोमीटर अंतरावर एका ठिकाणी पंपिंग चा वापर करून पुढे साधारणता ३४ अंतरातून ग्रॅव्हिटी द्वारे पाणी पोचविणे व एक छोटीशी चार चाकी जाईल एवढ्या व्यासाची पाईपलाईन टाकणे अशी शेकडो कामे भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प साकारून एक स्थापत्य]विषयक कामाचा उत्कृष्ट नमुना पुणे महापालिकेने दाखवून दिला आहे. ‘लेक टॅपिंग’ भामा आसखेड धरणांमध्ये या पाण्यापुरवठ्याच्या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडून करण्यात आला आहे. पाइपलाईनमधून कायम पाणीपुरवठा होईल याकरिता ज्या ठिकाणी तब्बल वीस मीटर खोल जाऊन बोगदा घेणे व सहा मीटरचा तळाचा खडक फोडून पाणी प्रकल्प आणणे हे दिव्य महापालिकेच्या अभियंत्यांनी करून दाखवले.