Bhandara Crime | घराच्या लिलावाची घोषणा ऐकताच तरुणाकडून रिक्षाचालकाला बेदम मारहाण

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – Bhandara Crime | भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑटोरिक्षावर लाऊडस्पीकर लावून घर लिलावाची अनाऊन्समेंट जिव्हारी लागल्याने एका तरुणाने ऑटोरिक्षाचालकावर हल्ला (Bhandara Crime) केला आहे. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानेश्वर गोवर्धन वैद्य असे या हल्ल्यात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी हि घटना घडली आहे. जखमी ज्ञानेश्वर गोवर्धन वैद्य हा अर्बन बँकेच्या मोहाडी शाखेच्या आदेशावरून डोंगरगाव येथे लिलावाची अनाऊन्समेंट करण्यासाठी ऑटोरिक्षाने गेला होता. सायंकाळी तो ऑटोरिक्षावरून गुंजनलाल मिश्रा यांच्या घराच्या लिलावाची अनाऊन्समेंट करीत होता. (Bhandara Crime)

 

यादरम्यान गोल्डी ऊर्फ युगदत्त मिश्रा त्याठिकाणी आला तू कशाला अनाऊन्समेंट करतो, तत्काळ अनाऊन्समेंट बंद कर, असे म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर त्याने रागाच्या भरात बैलगाडीची उभारी काढून ज्ञानेश्वरवर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला.
या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

 

 

Web Title :- Bhandara Crime | attack on rickshaw puller incident in bhandara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा