Bhandara Crime | धक्कादायक ! रस्‍त्‍यावर पाणी गेल्‍याच्या कारणावरुन झालेल्या वादात वृद्धाचा खून

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – Bhandara Crime | भंडारा तालुक्यातील (Bhandara Crime) मानेगाव बाजार येथे वृद्धाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात वृद्धाचा खून करण्यात आला आहे. महादेव श्रीपत बोंदरे (Mahadev Shripat Bondre) (वय 56 रा. मानेगाव बाजार) असे खून झालेल्‍याचे नाव असून या हल्‍ल्‍यात मुलगा दिनेश महादेव बोंदरे (Dinesh Mahadev Bondre) गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. ही घटना काल (मंगळवारी) घडली. याप्रकरणी संशयित आरोपींना अटक (Arrested) केली आहे.

 

चंद्रशेखर विठोबा मते (Chandrasekhar Vithoba Mate) (वय 50), विक्की चंद्रशेखर मते (Vicky Chandrasekhar Mate) (वय 24), मयूर चंद्रशेखर मते (Mayur Chandrasekhar Mate) (वय 19), सरिता चंद्रशेखर मते (Sarita Chandrasekhar Mate) (वय 47, सर्व रा. मानेगाव बाजार) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Bhandara Crime)

 

याबाबत माहिती अशी की, मानेगाव बाजार येथील मते आणि बोंदरे कुटुंब शेजारी – शेजारी राहतात. दोन्ही कुटुंबात काही वर्षांपासून वाद आहे. काल (मंगळवारी) रात्री महादेव बोंदरे हे आपल्या घरासमोर रस्त्यावर गाय धूत होते. ते पाणी मते यांच्या घरातील परिसरात गेले. चंद्रशेखर मते याने महादेव बोंदरे यांच्याशी वाद घातला. वाद सुरु होत असताना महादेव यांचा मुलगा दिनेश याने भांडण कशाला करता असे म्हटले.

त्यानंतर आराेपींनी दाेघांना जीवे मारण्याची धमकी देत बापलेकाला मारहाण सुरु केली. विक्की मते याने घरातून लाकडी काठी आणली. इतर आरोपींनी दिनेशला पकडून ठेवले. दिनेशला काठीने मारहाण करीत असता वडील महादेव त्याला वाचविण्यासाठी गेले. चंद्रशेखरने महादेव यांना अडविले. त्यानंतर महादेव यांच्या डोक्यावर काठीचा घाव घातला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने महादेव यांचा मृत्यू (Died) झाला आहे.

 

दरम्यान, याबाबत माहिती कळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव (SP Vasant Jadhav), उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील (DYSP Sanjay Patil),
कारधाचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात (Police Inspector Rajesh Kumar Thorat) व पोलीस पथकासह दाखल झाले.
याप्रकरणी कारधा पोलिसांकडून (Kardha Police Station) संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

Web Title :- Bhandara Crime | bhandara murder of an old man over a trivial dispute

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा