Bhandara Crime News | स्वस्तात दुचाकी घेऊन देण्याचे आमिष दाखवून 20 लाखांचा घातला गंडा

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – Bhandara Crime News | राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चोरी, अपहरण, फसवणूक, खून अशा घटना रोज ऐकायला मिळत आहेत. अशीच एक फसवणुकीची घटना भंडाऱ्यामध्ये घडली आहे. स्वस्तात दुचाकी देण्याचे आमिष दाखवून 20 लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार भंडारा या ठिकाणी घडला आहे. (Bhandara Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कासिफ जहीर खान, राजेंद्र राहांगडाले (25), हेमंत वंजारी (47, तिघे रा. भंडारा) अशी या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तिघांवर भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामधील एकाला अटक केली असून बाकी दोघांचा शोध सुरु आहे. आरोपींनी rie दुचाकी वाहनाचा शोरूमचा फायनान्सर असल्याचा बनाव करून ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढले. तसेच त्यांना ऑनरोड किमतीपेक्षा 10 ते 15 हजार रुपये कमी किमतीत दुचाकी देण्याचे आमिष दाखवले तसेच सहा महिन्यांच्या हप्त्यावर दुचाकी देत असल्याचे सांगितले. (Bhandara Crime News)

त्यांच्या या बोलण्याला भुलून लोकांनी दुचाकीच्या किमतीच्या 70 टक्के रक्कम एआयएम फायनान्स सोल्युशन सर्व्हिसेसकडे जमा केली. यानंतर आरोपींनी दुचाकीच्या शोरूममध्ये डाऊन पेमेंट करून दुचाकी ग्राहकांना दिली. सुरुवातीचे सहा हप्ते भरण्यात आले. मात्र, नंतरचे हप्ते ठरल्याप्रमाणे फायनान्स कंपनीकडे भरले नाही. त्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीने गाड्यांच्या जप्तीची कारवाई सुरु केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले. तब्बल 20 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार विजय सोविंदा कुथे (53, रा. पिंपळगाव, ता. लाखनी) यांनी भंडारा ठाण्यात दिली.

यानंतर भंडारा पोलिसांनी विजय सोविंदा कुथे यांच्या तक्रारीवरून कासिफ खान,
राजेंद्र राहांगडाले आणि हेमंत वंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी कासिफ जहीर खान याला मोठ्या शिताफीने अटक केली.
यानंतर त्याला भंडारा न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली
असून बाकी आरोपींचा शोध सुरु आहे.

 

Web Title :- Bhandara Crime News | 20 lakh fraud by given low cost bike fake promise in bhandara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | ऑस्ट्रेलियातील हॉटेलमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची २ कोटींची फसवणूक; नागपूरमधील दोघांवर गुन्हा दाखल

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाच’; पुण्यात मनसे-राष्ट्रवादीच्या ट्विटर वॉरची जोरदार चर्चा

DGP Rajnish Seth | गुन्ह्यातील शिक्षा दर वाढविण्यासाठी प्रयत्न – पोलीस महासंचालक रजनिश सेठ