भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – Bhandara Crime News | राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी जमावाकडून रोड रोमिओ बेदम मारहाण करण्यात आली आहे. (Bhandara Crime News)
काय आहे नेमके प्रकरण?
भंडारा जिल्ह्यातील मोहाडीतील बसस्थानक परिसरामध्ये हि घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त जमवाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.हि पीडित तरुणी ही मोहाडी बस स्थानक परिसरात लघुशंकेसाठी गेली असताना हा प्रकार घडला आहे.
हि तरुणी मोहाडी बस स्थानक परिसरात लघुशंकेसाठी गेली असताना आरोपीने तिचा पाठलाग करून तिची छेड काढली.
यानंतर मुलीने मोठमोठ्याने आरडाओरड केल्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आरोपी तरुणाला चांगलाच चोप दिला. यानंतर या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Bhandara Crime News | mob beated young boy over molest minor girl in bhandara
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jalgaon Crime News | खासगी कामासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा सिमेंटच्या ब्लॉकने केला घात