Bhandara Crime | 12 वी पास झाल्यानंतर सेलिब्रेशनसाठी गेलेल्या युवकाचा धक्कादायक शेवट

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – Bhandara Crime | बारावी परीक्षेचा निकाल (12th Exam Result) लागल्यावर पास झाल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन (Celebration) सुरू केलं. अशाच प्रकारे भंडाऱ्यातील (Bhandara Crime) निखिल महादेव बालगोटे Nikhil Mahadev Balgote (वय 17) हा देखील आपल्या मित्रांसोबत सेलिब्रेशन करायला गेला. मात्र निखिलचा वैनगंगा नदी (Wainganga River) पात्रात बुडून मृत्यू (Died) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील माडगी रेल्वे पुलाखाली ही घटना घडली आहे. बारावीत निखिलला 57 टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल निकाल लागल्याच्याच दिवशी 3 मित्रांसह माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. नदी दिसताच पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी पोहण्याचा मनोसोक्त आनंद घेतला. दरम्यान, निखिलचा तोल जाऊन तो नदी पात्रात बुडाला. (Bhandara Crime)

दरम्यान, त्यावेळी 2 मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना आरडाओरडा केला. पण, तोपर्यंत निखिलचा मृतदेह वाहून गेला. या घटनेबाब माहिती समजताच तुमसर पोलिसांनी (Tumsar Police) घटनास्थळी धाव घेतली. जवळपास एक ते दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालय (Tumsar Sub-District Hospital) इथं पाठविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Bhandara Crime | unfortunate death of a student who went to party after 12th pass results

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा