तब्बल २५ वर्षानंतर भंडारदरा ‘कोरडे’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शंभर वर्षांपूर्वी भंडारदरा धरणाच्या तळाशी बसविलेल्या दोन मोऱ्यांच्या झडपांची पाहणी करण्यात येणार आहे. म्हणून धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा भंडारदरा कोरडे झाले आहे.

१९१० मध्ये भंडारदरा धरणाच्या कामास सुरुवात झाली होती. यावेळी पाणी सोडण्यासाठी बसविलेल्या मोऱ्यांच्या झडपा इंग्लंडहून बोटीने मुंबईपर्यंत आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर व्हॉल्व तयार करण्यात आले. ते ११६ वर्षांपूर्वी तयार केले होते. ५० आणि १०० फुटांवर बसविलेल्या या झडपांची नेमकी काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी पंधरा वर्षापूर्वी पाणबुड्यांच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली होती. या झडपांमध्ये बसविलेल्या रॉडची जाडी काहीशी कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. ५० फुटावरील मोरीच्या पातळीपर्यंत पाणी सोडण्यात आल्याने धरण पूर्ण रिकामे झाले आहे.

मृतसाठ्यातील पाणी निळवंडेत सोडले
भंडारदरा धरणात सध्या उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. ३०० दशलक्ष घनफूट मृतसाठ्यातील २४ दशलक्ष घनफूट पाणी वॉल्व्ह दुरुस्तीसाठी नदीपात्रात सोडण्यात आले. ते पाणी निळवंडेत गेले. सध्या धरणात मृतसाठ्यातील २७६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे.आता देखभाल दुरुस्तीचा निर्णय होणार आहे. भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात साठविण्यात आले आहे.

आरोग्य विषयक वृत्त

दुर्लक्ष करू नका, ‘सायलेन्ट हार्ट अटॅक’ची लक्षणे जाणून घ्या

नकळत होणाऱ्या ‘ह्या’ वेदनांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते ‘जीवावर’

माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

गॅस, अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी करा ‘ही’ एक्सरसाइज ; मिळेल आराम

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like