भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा राष्ट्रवादीशी सामना

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन

सगळ्यांचे लक्ष लागून असलेली भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून त्यासाठी त्यांनी आपला उमेदवारही निश्चित केला आहे. नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने इथे पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे आता भाजपचे हेमंत पटेल यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे असा सामना रंगणार आहे.

या पोटनिवडणुसाठी माजी आमदार मधुकर कुकडे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. ते उद्या (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत उमेदवार निश्चितीसाठी काल (बुधवार) प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून विजय शिवनरकर यांचेही नाव चर्चेत होते. पण अखेर मधुकर कुकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याठिकाणी प्रफुल्ल पटेल तसेच त्यांच्या कुटुंबीयांपैकी लोकसभा लढवण्यास इच्छुक नसल्याचे पटेल यांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी इतर उमेदवाराची चाचपणी सुरु होती.