Bhangire Pramod alias Nana Vasant | महंमदवाडी येथे हॉस्पीटलचे आरक्षण बदलून उद्यान उभारावे ! प्रभागातील उर्वरीत कामे पुर्ण करण्याची निधी उपलब्ध करून द्यावा; माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhangire Pramod alias Nana Vasant | महमंदवाडी (Mohammed Wadi) येथील सर्वे नं. ३ येथील न्याती गार्डन (Nyati Gardens) सोसायटीलगतच्या अ‍ॅमेनिटी स्पेसवरील (PMC Amenity Space) हॉस्पीटलचे आरक्षण बदलून त्या जागेवर उद्यान उभारावे अशी मागणी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. (Bhangire Pramod alias Nana Vasant)

 

भानगिरे यांनी यासंदर्भात शिंदे यांची भेट घेउन निवेदन दिले आहे. त्यामध्ये प्रभाग क्र. २६ महंमदवाडी- कोैसरबाग मध्ये महमदवाडीतील सर्वे नं. ३ येथील न्याती गार्डन लगतच्या अ‍ॅमेनिटी स्पेसवर महापालिकेने हॉस्पीटलचे आरक्षण टाकले आहे. विशेष असे की येथे शेजारीच १०० मीटरवर नुकतेच महापालिकेने कै. दशरथ बळीबा भानगिरे यांच्या नावाने तीन मजली हॉस्पीटल उभारले आहे. त्यामुळे न्याती गार्डन लगतच्या अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेवर हॉस्पीटल उभारण्याऐवजी उद्यान उभारावे अशी स्थानीक नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या भावनांचा आदर करून याठिकाणचे हॉस्पीटलचे आरक्षण बदलून उद्यानाचे आरक्षण करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

यासोबतच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अर्थ संकल्पातून महंमदवाडी- कौसरबाग प्रभागातील हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, स्व. गोपीनाथ मुंडे उद्यान, स.नं. १२ मधील बॅडमिंटन हॉल, स.नं. ७३ येथील जलतरण तलाव, गुजर शाळेजवळील पाझर तलावाचे उर्वरीत काम पुर्ण करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणीही भानगिरे यांनी या निवेदनात केली आहे.

Web Title :- Bhangire Pramod alias Nana Vasant | Change the reservation of hospital at Mahammadwadi and build a park! Funds should be made available for completion of remaining works in the ward; Demand of former corporator Nana Bhangire to Urban Development Minister Eknath Shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा