Bhangire Pramod alias Nana Vasant | ‘शहरी गरीब योजना कार्ड’ काढण्याच्या कार्यालयाचा विस्तार करा, प्रमोद भानगिरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhangire Pramod alias Nana Vasant | पुणे शहरातील (Pune City) सर्वसामान्य, गोरगरीब व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना शहरी गरीब योजनेचा (Shahri Garib Yojna) फायदा मिळावा यासाठी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये (Regional Offices) ‘शहरी गरीब योजना कार्ड’ काढण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना वसंत भानगिरे (Bhangire Pramod alias Nana Vasant) यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांकडे (PMC Municipal Commissioner) केली आहे. याबाबत प्रमोद भानगिरे यांनी निवेदन दिले आहे.

प्रमोद भानगिरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आरोग्य विभाग (Health Department) अंतर्गत असलेल्या ‘शहरी गरीब योजना कार्ड’ काढण्याचे एकमेव कार्यालय शिवाजीनगर येथील पालिकेच्या मुख्य इमारतीत कार्यरत आहे. या ठिकाणी पालिका हद्दीतील हजारो नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. अनेक नागरीक अथवा त्यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असतात किंवा त्यांना दाखल करावयाचे असते. मानसिक तणावात असलेल्या नागरिकांना दिवस-दिवस आपला वेळ कार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. या नागरिकांचा तणाव दूर करण्याच्या हेतूने तसेच या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावा, तसेच मुख्य इमारतीमधील कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा या हेतूने पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘शहरी गरीब योजना कार्ड’ काढण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. (Bhangire Pramod alias Nana Vasant)

शहरी गरीब योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य पुणे माहापालिकेच्या माध्यमातून मिळत असते. याच अनुषंगाने विधवा निराधार महिला, अपंग, दिव्यांग या नागरिकांसाठी दोन ऐवजी तीन लाख रुपये जास्तीची तरतुद करुन त्यांना सहकार्य करावे. या मागणीचा विचार करुन नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही व प्रशासनाचा ताण कमी व्हावा, या हेतूने येत्या 15 दिवसांच्या आत ही मागणी मान्य करावी. अन्यथा शिवसेना (Shivsena) पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईल नुसार तीव्र आंदोलन आपल्या कार्यालयावर केले जाईल. त्यावेळी होणाऱ्या दुष्परिणामास आपले कार्यालय पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा प्रमोद भानगिरे यांनी निवेदनातून दिला आहे.

Web Title : Bhangire Pramod alias Nana Vasant | Expand the office for issuing ‘Urban Poor Scheme Card’, Pramod Bhangire’s demand to Municipal Commissioner

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त