स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिल्यानं पुरस्काराचा सन्मान वाढेल : शरद पोंक्षे

पिंपरी : पोलसनामा ऑनलाइन – स्वा. सावरकर हे महान क्रांतीकारक, लेखक, नाटककार, कवी, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांचे कार्य भारतरत्न पुरस्कारापेक्षा हि महान आहे. मात्र, आजतागायत त्यांना भारतरत्न मिळाला नाही. या देशात खेळण्यासाठी करोडो रुपये घेणाऱ्या क्रिकेटपटूंना भारतरत्न दिला जातो मात्र, देशासाठी काळया पाण्याची शिक्षा भोगणारे स्वा.सावरकरांना दिला जात नाही, अशी खंत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. त्यामुळे स्वा.सावरकरांना भारतरत्न दिल्याने पुरस्काराचा सन्मान वाढेल. नवीन पिढी जेव्हा भारतरत्न पुरस्कार प्राप्त भारतीयांची नावे शोधेल, त्यावेळी स्वा. सावरकरांच्या कार्याची ओळख होत राहील, असे मत शरद पोंक्षे यांनी मांडले.

पोंक्षे पुढे म्हणाले कि, “आज सावरकरांच्या नावावरून आज राजकारण घडत आहे, ही खेदजनक बाब आहे. दुर्दैवाने स्वा.सावरकर हे या मातीत रुजले नाही. पिकले नाहीत. केवळ ते जातीवादाच्या राजकारणात भरडले गेले. तसेच हिंदू संस्कृती हि सर्वसमावेशक असून सर्वांना सामावून घेणारी आहे. ” वसुधैव कुटुंबकम” अशी भावना जपणारा हिंदू धर्म आहे. हिंदू धर्माची व्याप्ती मोठी आहे. अनेक परकीय आक्रमणे होवून देखील विविधतेत एकता असलेली हिंदू संस्कृती टिकून आहे. भारत देशात ८०% हिंदू असल्याने हिंदूत्व देश व्हावा.

रोटरी क्लब ऑफ़ चिंचवड च्या वतीने आयोजित शिशिर व्याख्यानमालेत “स्वा. सावरकरांना अभिप्रेत हिंदुस्तान” या विषयावर ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ़ चिंचवडचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे,सचिव प्रवीण गुणवरे यांच्या हस्ते कातकरी समाजाच्या मुलींचा सांभाळ करणारे अंजली व मकरंद घारपुरे या दांपत्यास “सेवा गौरव” पुरस्कार देवून सन्मानित केले.

त्या मुलाचे आभार :
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कारकिर्दीत स्वा.सावरकरांचे तिकीट काढले. इंदिरा गांधींनी स्वतःच्या खात्यातून मुंबईतील स्वा.सावरकरांच्या संस्थेस १५ हजार देणगी दिली. हा इतिहास आपल्या आजींचा माहिती नाही. नाही तो काय पुरस्कार देणाऱ? ज्यांना गोळवलकर किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असे स्पष्ट उच्चार करता येत नाही. महापुरुषांबद्दल काहीतरी निषेधार्थ बोलतो. मात्र त्याचे मी आभार मानतो. जेव्हा तो निषेधार्थ बोलतो तेव्हा हिंदू जागा होवून राष्ट्रपुरुषांची माहिती शोधतात आणि सोशल मीडियावर व्हायरल करतात. यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे वक्तव्य राहुल गांधी यांचे नाव न घेता पोंक्षे यांनी शेवटी केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/