Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई, गावठी दारु तयार करणाऱ्या ठिकाणांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पुणे भरारी पथकाने गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई (Pune Crime News) हडपसर येथील काळेपडळ आणि बहुली गावच्या हद्दीत केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक सोमवारी (दि.8) हडपसर परिसरात गस्त घालत असताना तीन चाकी टेम्पोमधून गावठी दारुची वाहतूक करणाऱ्या अभिषेक उद्धव झगडे (वय-23) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन चाकी टेम्पो व 560 लिटर गावठी दारु असा एकूण 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडे चौकशी केली असता काळेपडळ येथील ढेरे कंपनीजवळ (Dhere Company) दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News) पथकाने दारु तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणी छापा मारुन 2400 लिटर रसायन, 175 लिटर गावठी दारु तसेच दारु तयार करणासाठी लागणारे साहित्य असा एकूण 63 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत हातभट्टी मालकासह दोन जणांना अटक केली. काळेपडळ येथे केलेल्या कारवाईत भरारी पथकाने 5 आरोपींना अटक करुन 2 लाख 87 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तर बहुली गावच्या हद्दीतील हातभट्टी तयार करण्याच्या ठिकाणावर छापा मारुन 2 आरोपींना ताब्यात घेऊन 1 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे चौकशी केली असता वारजे माळवाडी (Warje Malwadi) येथील बालाजी शिरमेवाड याच्या घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दारु असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून 9 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजुर करुन त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली.

 

ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी (Commissioner Dr. Vijay Suryavanshi),
संचालक सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांच्या आदेशानुसार पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त (Pune Divisional Deputy Commissioner)
मोहन वर्दे (Mohan Warde), अधीक्षक चरणसिंग राजपूत (Superintendent Charan Singh Rajput),
उपअधीक्षक संजय पाटील (Deputy Superintendent Sanjay Patil), युवराज शिंदे (Yuvraj Shinde),
एस.बी. जगदाळे (S.B. Jagdale) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक दोन पुणे यांनी केली. या कारवाईत निरीक्षक तानाजी शिंदे, बाळासाहेब नेवसे, आर.डी. भोसले, दुय्यम निरीक्षक व जवान स्टाफ एस.बी. मांडेकर, के.आर. पावडे, जी.बी वाव्हळे, ए.आर. सिसोलेकर यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक तानाजी शिंदे करीत आहेत.

 

Web Title :- Bharari Squad of State Excise Department’s major operation, raids on Gavathi Daru manufacturing places; Assets worth lakhs seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | ‘आधी निकाल येऊ द्या, मग आपले ज्ञान पाजळा’- संजय शिरसाट

Drug Free Mumbai | ‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहिम ! अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’
मोहिम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Maharashtra Political Crisis | पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढवणार’ – देवेंद्र फडणवीस

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : ऑनलाइन जुगाराचा नादच खुळा !
गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्‍यास अटक, 21 लाखाचा माल जप्त

Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’