‘मला नको आहे नॅशनल अवॉर्ड’ : सलमान खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानला चित्रपटसृष्टीत काम करत तीन दशकं पूर्ण झाली आहेत. या 30 वर्षात सलमानने शेकडो सिनेमात काम केलं आहे. आणि बॉक्स ऑफिसवर अनेक दशकं राज्यही केलं आहे. मागील एका दशकापासून बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्डही सलमान खान बनवत असतो. अनेक फ्रेंचाईज सिनेमे आहेत, काही सिनेमे तर केवळ सलमान खानच्या स्टारडमवर धुवाधार कमाई करतात.

सलमान खान एवढा मोठा स्टार आहे की, जर एखाद्या वर्षी त्याचा सिनेमा आला नाही तर, बॉलिवूडचं गणित गडबडतं. असे असले तरी सलमान खानला आपल्या अभिनयासाठी कधी राष्ट्रीय सन्मान मिळाला नाहीये. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सलमानला नॅशनल अवॉर्डबाबत विचारले असता त्याने क्षणाचाही विलंब न लावता लगेचच सांगितले की, ‘मला नॅशनल अवॉर्ड नको आहे.’

मुलाखतीत सलमान खानला विचारण्यात आले की, तुम्हाला नाही वाटत का की, तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळायला हवा ? त्यावर सलमान म्हणाला की, “मला नाही पाहिजे नॅशनल अवॉर्ड किंवा आणखी कोणताही अवॉर्ड. मला फक्त रिवार्ड पाहिजे. नॅशनल अवॉर्ड तर तेव्हाच मिळतो जेव्हा लोकं थिएटरमध्ये जाऊन माझा सिनेमा पाहतात. पूर्ण देशाने माझा सिनेमा पहावा, बस. यापेक्षा मोठा नॅशनल अवॉर्ड आणखी कोणता असणार ?

वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर सलमानचा आगामी सिनेमा 5 जून रोजी प्रदर्शित होत आहे. अली अब्बास जफर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात सलमान आणि कॅटरीना व्यतिरीक्त नोरा फतेही, तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी आणि सुनील ग्रोवर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Loading...
You might also like