‘हे’ आहे अभिनेत्री दिशा पाटनीचे ‘फिटनेस सिक्रेट’ आणि ‘हा’ तिचा डायट ‘प्लॅन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिगर आणि फिटनेससाठीही प्रसिद्ध आहेत. जितका लोकांना तिचा फिटनेस आवडतो तितकीच तिची फिगर आणि फिटनेसही लोकांना आवडते. ती अनेकदा तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. तिचा फिटनेस सर्वांना आवडतो शिवाय तिच्या डाएट प्लॅनविषयी जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. आज आपण दिशा पाटनीचा डाएट प्लॅन आणि फिटनेस सिक्रेट जाणून घेणार आहोत.

disha-patni-2

दिशाने अनेक मुलाखतीत बोलताना तिचं फिटनंस सिक्रेट सांगितले आहे. शिवाय ती नेहमीच म्हणत असते की, तु्म्हाला परफेक्ट फिगर आणि फ्लेक्सिबल बॉडी हवी असेल तुम्ही वर्कआऊट डाएट करणं गरजेचं आहे. तु्म्हाला सांगू इच्छितो की, दिशा तिच्या अ‍ॅब्जला घेऊन खूपच जागरुक आहे. ते मेंटेन राहण्यासाठी ती खूप मेहनत घेते. ती हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करते.

असा आहे दिशाचा डाएट –

दिशा ब्रेकफास्टमध्ये रोज 2-3 अंडी, टोस्ट, दूध आणि ज्यूस घेते. याशिवाय ती लंचमध्ये तसेच डिनरमध्ये ताजी फळं, ज्यूस, हिरव्या भाज्यांचं सलाड, ब्राऊन राईस आणि डाळ यांचा समावेश असतो. याशिवाय मधल्या वेळेत ती बदाम किंवा शेंगदाणे खात असते.

लंचमध्ये दिशा ‘हा’ पदार्थ जास्त आवडतो

दिशा लंच करताना ती कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थ घेत असते. राईस चिकन खाणं दिशाला खूप आवडतं. यासोबतच कधी तिची इच्छा झाली ती उकडलेली अंडीही खाते. बॉडी डीहायड्रेट होऊ नये यासाठी दिशा विशेष काळजी घेते. दिशा दिवसभरात भरपूर पाणी पिते.
disha-patni5

‘हे’ आहे दिशाच्या फिटनेसचं सर्वात मोठं रहस्य

दिशा तिच्या फिटनेससाठी खूपच मेहनत घेते. फक्त चांगला डाएट नाही तर इतर गोष्टींचीही ती काळजी घेताना दिसत असते. दिशाच्या फिटनेसमागचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे डान्सिंग, स्विमिंग, वेट ट्रेनिंग आणि योगा हे आहे. विशेष बाब अशी की, आठवड्यातून चार दिवस दिशा जीमला जाते. या चार दिवसात ती दिवसातून 2 वेळा जीमला जाते. उल्लेखनीय बाब अशी की, कुंगफू योगा या सिनेमाच्यावेळी दिशा स्क्वेअर डान्सही शिकली होती.