‘देशव्यापी बंद’ मध्ये सहभागी होणार्‍या नोकरदारांचा ‘पगार’ कापणार, मोदी सरकारचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशामध्ये अनेक मोठ्या कामगार संघटनांनी आजच्या दिवशी संपाची घोषणा केली आहे त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्र आणि वाहतुकीवर मोठी परिणाम होणार आहे. यामध्ये देशातल्या 10 मोठ्या कामगार संघटनांनी एकत्रितपणे बंदची हाक दिली आहे. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असं या संघटनांचं म्हणणं आहे. मात्र या बंदला पाठिंबा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे. असा इशारा मोदी सरकारनं दिला आहे. जनतेविरोधातील धोरणांसाठी भारत बंदची हाक दिल्याची माहिती यात सामील झालेल्या संघटनांनी दिली आहे. INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC या आणि इतर स्थानिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

या बंदमध्ये सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत भत्त्यात देखील कपात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच बंदमध्ये सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर पद्धतीने कारवाई केली जाणार आहे. बँकिंग सुधारणा, बँकांचे विलीनीकरण याचा निषेध म्हणून हा संप करण्यात येणार आहे. याशिवाय वेतनवाढीच्या प्रमुख मागणीचाही यात समावेश आहे. यासोबत 5 दिवसांचा आठवडा, नव्या कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती आणि त्यामुळे कामावर येणार ताण या सगळ्या मागण्यांसाठी बँकेतील कर्मचारी एक दिवसाच्या संपात सहभागी होणार आहेत.

या बंदचा मोठा परिणाम मुंबईवर पडेल असे सांगण्यात येत होत मात्र सकाळी तरी मुंबई सुरळीत असल्याचे दिसून आले. सर्व रेल्वे गाड्यांसह शाळा, कॉलेज सुरु होते मात्र यावेळी चोख बंदोबस्त पहायला मिळाला. कर्माचाऱ्यांच्या 12 विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशभारातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढणार असल्यामुळे हा संप करत असल्याचं कामगार नेते विश्वास उटगी म्हणाले. बंदच्या पार्श्वभूमीवर देशभरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षाच्या कामगार संघटनांनी भारत ‘बंद’चं आवाहन केलं आहे. अनेक विद्यार्थी संघटना देखील आपल्या मागण्यांसाठी या बंदला पाठींबा देणार आहेत. JNU मध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी देखील बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/