भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

ब्राझिलिया : वृत्त संस्था – भारतीय कोरोना व्हॅक्सिन कोव्हॅक्सिन (Indian Corona Vaccine) च्या खरेदीत भष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने शेवटी ब्राझिल (Brazil) ने भारत बायोटेक (Bharat Biotech) बरोबर केलेला करार रद्द केला आहे. भारत बायोटेक  (Bharat Biotech) ब्राझीलला ३२४ मिलियन डॉलरची लस पुरविणार होता. मात्र, या कराराबाबत थेट राष्ट्रपती जायर बोल्सोनेरो (President Zaire Bolsonaro) यांच्यावरच भष्ट्राचारा (Corruption) चा आरोप झाला. या सौद्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. हा सर्व प्रकार सर्वोच्च न्यायालया ( Supreme Cour) त गेला. तेव्हा ब्राझील सरकारने करारच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो (Health Minister Marcelo) यांनी याची घोषणा केली. यामुळे भारत बायोटेकला मोठा झटका बसला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

या करारानुसार भारत बायोटेक ब्राझीलला २० मिलियन कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा करणार होती. हा करार झाल्यानंतर व्हीसलब्लोअरमार्फत सातत्याने ब्राझील सरकारवर आरोप केले जात होते. सरकारने याचे स्पष्टीकरणही दिले. परंतु, त्याचा काही फरक पडला नाही. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनच खरेदी करण्याचा आरोग्य मंत्रालयातील अधिकार्‍यांवर दबाव होता, असा आरोप करण्यात आला होता. याची माहिती राष्ट्रपती जायर यांना होती.

तरीही हा करार थांबविण्यात आला नाही. ब्राझीलला महागडी कोव्हॅक्सिन खरेदी करावी लागली असा आरोप केला जात होता. त्यानंतर संसदीय समितीमार्फत या खरेदीबाबत चौकशी सुरु झाली. ब्राझीलच्या जवळ फायझर लस खरेदी करण्याचा पर्याय होता. असे असूनही त्यांनी भारत बायोटेकची महागडी लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हे आरोप सिद्ध झाले असते तर, राष्ट्रपती जायर यांना खुर्ची सोडावी लागली असती. त्यामुळे शेवटी ब्राझील सरकारने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस खरेदी करण्याचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत बायोटेकला मोठा झटका बसला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Bharat Biotech |  Brazil suspend covaxin deal over corruption allegations

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API, पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर