Good News : स्वदेशी वॅक्सीन ’Covaxin’ च्या फेज-2 ट्रायलला मिळाली परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरू

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्याविरोधात स्वदेशी वॅक्सीन कोवॅक्सीनच्या दुसर्‍या टप्प्यातील ट्रायलला केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. हैद्राबाद येथील भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची दुसर्‍या टप्प्यातील ट्रायल 7 सप्टेंबरपासून सुरू होईल. आरोग्य सेवा महासंचालनालयाने याबाबत वक्तव्य जारी करत म्हटले आहे की, 3 सप्टेंबरला व्हर्च्युअल मीटिंगद्वारे तज्ज्ञांमध्ये या वॅक्सीनच्या दुसर्‍या टप्प्याच्या ट्रायलवरील प्रस्तावावर चर्चा झाली होती आणि यानंतर ट्रायलला मंजूरी देण्यात आली. भारत बायोटेक दुसर्‍या टप्प्यातील ट्रायल 380 वालंटियर्सवर करणार आहे. वालंटियर्सना वॅक्सीनचा डोस दिल्यानंतर चार दिवसांपर्यंत त्यांची स्क्रीनिंग होईल.

यापूर्वी कोवॅक्सीनच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलमधील परिणाम सुद्धा सकारात्मक आले आहेत. पहिल्या टप्प्यात ह्यूमन ट्रायलमध्ये ज्या लोकांना ही वॅक्सीन देण्यात आली होती, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट दिसून आला नाही. यानंतर भारत बायोटेकने दुसर्‍या टप्प्यासाठी तयारी सुरू केली होती.

इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि एसयूएम हॉस्पिटलमध्ये ट्रायलची माहिती देताना, डॉ. ई वेंकट राव यांनी सांगितले की, ज्या लोकांना वॅकसीनचा डोस देण्यात आला होता, त्यांच्या शरीरात अँटीबॉडी आणि वॅक्सीनचा प्रभाव जाणून घेण्यासाठी ब्लड सॅम्पल घेण्यात आले. ब्लड सॅम्पलची तपासणी केली असता लोकांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट आढळला नाही.

वालंटियर्सना दिले वॅक्सीनचे दोन डोस
डॉ. ई वेंकट राव यांनी सांगितले की, वालंटियर्सना एका स्क्रीनिंग प्रक्रियेंतर्गत निवडून वॅक्सीनचे दोन डोस देण्यात आले होते. पहिल्या दिवशी वॅक्सीनचा डोस दिल्यानंतर ब्लड सॅम्पल घेण्यात आले आणि त्यानंतर 14व्या दिवशी वॅक्सीनचा डोस दिल्यानंतर पुन्हा ब्लड सॅम्पलची तपासणी केल्यानंतर 28, 42, 104 आणि 194 दिवसांच्या अंतराने सुद्धा वालंटियर्सचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले, जेणेकरून वॅक्सीनच्या प्रभावाचे मुल्यांकन करता येईल.

इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि एसयूएम हॉस्पिटल देशातील त्या 12 मेडिकल सेंटरपैकी एक आहे, ज्यांना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने भारत बायोटेकने कोवॅक्सीनच्या ह्यूमन ट्रायलसाठी निवडले आहे. तर, दुसर्‍या टप्प्यातील ट्रायलमध्ये भाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. जर तुम्हाला सुद्धा कोवॅक्सीनच्या दुसर्‍या टप्प्यातील ट्रायलमध्ये भाग घ्यायचा असेल तर http://ptctu.soa.ac.in वर संपर्क करू शकता. देशात सध्या सात वॅक्सीन वेगवेगळ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये आहेत.