Coronavirus Vaccine : दिलासादायक ! पहिल्या टप्प्यात भारतीय बनावटीची लस सुरक्षित असल्याचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  एकीकडे देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. तर दुसरीकडे वैज्ञानिक दिवसरात्र एकत्र करून कोरोनावरील लस विकसित करत आहेत. असं असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR विकसित करत असलेल्या कोवॅक्सिन या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीत ही लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक टप्प्यात जो काही निकाल समोर आला आहे त्यावरून ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झाडयस कॅडीला या कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.

पीजीआय रोहतकमध्ये सुरू असलेल्या चाचणीच्या टीम लिड सविता वर्मा यांनी सांगितलं की, “ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही जेवढ्या स्वयंसेवकांना ही लस दिली आहे त्यांच्यावर कोणतेही साईडइफेक्ट्स जाणवले नाहीत.”

भारतातील 12 शहरात 375 स्वयंसेवकांवर कोरोना लसीची चाचणी करण्यात आली आहे. प्रत्येक स्वयंयसेवकाला या लसीचे 2 डोस देण्यात आले. यानंतर त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे. या नमुन्यांच्या मदतीनं लसीच्या इम्युनॉडेनिसिटीचा अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

सविता वर्मा यांनी सांगितलं की, “ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे याची आम्हाला खात्री झाली आहे. आता ही लस दुसऱ्या टप्प्यात किती प्रभावशाली ठरते हे पाहिलं जाणार आहे. यासाठी आम्ही रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात देखील केली आहे.”

एम्समध्ये 16 स्वयंसेवकांवर चाचणी

दिल्लीतील एम्सचे प्रमुख संजय राय यांनी सांगितलं की, ही लस सुरक्षित आहे. एम्समध्ये भारत बायोटेकच्या लसीच्या चाचणीसाठी 16 स्वयंसेवकांना दाखल करण्यात आलं आहे.

देशासह जगभरात सध्या कोरोनावर लस विकसित करण्याचं काम सुरू आहे. कोवॅक्सिन ही देशातली पहिली लस आहे. भारत बायोटेक आणि ICMR कडून ही लस विकसित केली जात आहे. सर्वच 12 ठिकाणी या लसीचे निकाल पाहिल्यानंतर आता कंपनी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी दुसऱ्या टप्प्यात संपर्क साधणार आहे. जर सर्व काही योग्य राहिलं तर पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच ही सल उपलब्ध होईल अशी माहिती एक वैज्ञानिकानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like