आता 2 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुलांच्या Covaxin ची दुसऱ्या अन् तिसऱ्या टप्प्यातील trials सुरु होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. जास्तीत लोकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोना महामारीविरोधात लढ्यामध्ये लहान मुलांसाठी भारत बायोटेक लस बनवत आहे. 2 ते 18 वयोगटातील बालके आणि मुलांच्या या लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी एक्सपर्ट समितीने मंगळवारी (दि. 11) शिफारस केली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीची चाचणी दिल्ली आणि पटनाच्या एम्समध्ये आणि नागपुरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटसह विविध ठिकाणी होणार आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेच्या कोरोनावरील तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकने दिलेल्या अर्जावर चर्चा केली. यात भारत बायोटेकने बनविलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये सुरक्षा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह अन्य गोष्टींचे आकलन करणे आणि चाचणीच्या दुसऱ्या, तिस-या टप्प्याला परवानगी देणे आदी मागण्या केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाईम्सने असे वृत्त दिले होते की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (18+) बदलणाऱ्या कोरोना व्हायरसविरोधात अँटबॉडी बनविण्यास प्रभावी आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. सामान्य कोरोना रुग्णांवर कोरोनाची लस ही 78 टक्के प्रभावी असल्याचे म्हटले होते.