मोदी सरकारनं सुरु केली ‘Bharat Bond ETF’ ही फायदेशीर ‘योजना’, जाणून घ्या वैशिष्ट्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटमध्ये ‘भारत बाँड इटीएफ’ला मंजुरी देण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतची घोषणा केली. हा देशातील पहिला ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ असणार आहे. या योजनेत 3 वर्ष आणि 10 वर्ष अशा दोन स्वरुपाच्या योजना असतील. म्हणजे एक योजना 2023 ला मॅच्युअर होईल तर दुसरी 2030 ला मॅच्युअर होईल.

या Bharat Bond ETF योजनेत 12 सरकारी कंपन्याचे  शेअर्स असतील. यात हायवे ऑथॅरिटी ऑफ इंडिया, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, नाबार्ड, एक्झिम बँक, न्यूक्लिअर पॉवर, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन, आसी पॉवरग्रिड या कंपन्याचे शेअर असतील. या डझनभर कंपन्यामध्ये 1 हजार युनिट साइज असेल आणि त्या माध्यमातून पैसे जमा केले जातील.

लवकरच सुरु होणार योजना –
Bharat Bond ETF या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट क्षेत्र आणि घाऊक गुंतवणूकदार यांंचे लक्ष वेधण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.

काय आहे Bharat Bond ETF ची वैशिष्ट्य –

1. यात कोणत्याही सरकारी बाॅंडमध्ये किंवा CPSE,CPSU, CPFI गुंतवणूक करता येईल.

2. युनिट साइज कमीत कमी 1 हजार रुपये असेल.

3. ट्रान्सपरंट पोर्टफोलिओ

4. एक्सचेंजवर बाॅंडमध्ये ट्रेडिंग होईल.

5. ट्रान्सपरंट NAV

6. सध्या याचा मॅच्युरिटीची कालावधी 3 आणि 10 वर्षांचा असेल.

7. ETF ठराविक मॅच्युरिटी असेल.

Visit : policenama.com