Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेचा अग्निपरीक्षेचा टप्पा उद्यापासून सुरु; प्रियंका गांधी मैदानात

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेने आतापर्यंत 1800 किमीचा टप्पा पार केला आहे. यात्रा आता मध्य भारतात आहे. यात्रेने केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील टप्पा पार केला. आता यात्रा उद्यापासून मध्य प्रदेशात घुसणार आहे. तसेच मध्य प्रदेश हे भाजप शासित राज्य असल्याने आता भारत जोडो (Bharat Jodo Yatra)यात्रेची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील मैदानात उतरल्या आहेत. उद्यापासून त्या राहुल गांधी यांच्यासोबत चालणार आहेत.

 

मध्य प्रदेश हिंदी भाषिक राज्य आहे. त्यामुळे या यात्रेला मिळणारा प्रतिसाद महत्वाचा ठरणार आहे. तसेच मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. दक्षिणेत भाजप नगण्य असल्याने यात्रेत काही अडथळे आले नाहीत. महाराष्ट्रात देखील भाजपचे डबल इंजिन सरकार असून, यात्रेला काही विशेष बाधा आली नाही. पण भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra)खरी कसोटी उत्तरेत लागणार आहे. कारण, उत्तरेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना प्रियंका गांधी सोबत करणार आहेत. महाराष्ट्रात या यात्रेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. तोच प्रतिसाद राहुल गांधी यांना कायम राखायचा आहे. हे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रियंका गांधी मैदानात उतरणार आहेत. उद्यापासून पुढील चार दिवस प्रियांका गांधी भारत जोडो यात्रेत चालणार आहेत. काँग्रेस नेते आणि माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात वि. दा. सावरकर यांच्यावर भाष्य केले.
त्यामुळे कदाचित उत्तरेत भाजपशासित राज्यांत त्यांच्या यात्रेला विरोध होऊ शकतो.
पण काँग्रेसने त्यांची भूमिका काय आहे, हे सांगितले.
त्यामुळे महाराष्ट्रात त्यांचे मित्रपक्ष शिवसेना आदी नाराज झाले होते. भाजपला तर आयते हातात कोलीत मिळाले होते.
मध्य प्रदेश काँग्रेसची जबाबदारी कमल नाथ यांच्याकडे आहे.
काँग्रेस कमलनाथ यांच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
त्यामुळे मध्य प्रदेश काँग्रेससाठी भारत जोडो यात्रा खूप महत्त्वाची ठरणार आहे.

 

Web Title :- Bharat Jodo Yatra | rahul gandhi bharat jodo yatra will enter in madhya pradesh tomorrow priyanka gandhi will join for four days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत