‘कोरेगाव भीमा हिंसाचाराची देवेंद्र फडणवीसांना पूर्वकल्पना होती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पुणे येथील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना होती. या दंगलीला त्यांचीच फूस होती, असे मेश्राम यांनी म्हटले आहे. फडणवीस यांची याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मेश्राम म्हणाले, कोरेगाव भीमा येथे उफाळलेल्या दंगलीला तत्कालीन राज्य शासन जबाबदार आहे. या दंगलीमागे मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा हात आहे. याबाबतचे पुरावे भारत मुक्ती मोर्चाकडे आहेत. हे पुरावे आम्ही उच्च न्यायालय आणि चौकशी आयोगासमोर सादर केले आहेत. यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना क्लिनचिट दिली होती. म्हणूनच कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मेश्राम यांनी केली.

कोरेगाव भीमामुळेच बडोले-कांबळेंची गच्छंती
तत्कालीन भाजप सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे हे आंदोलकांच्या बाजूने होते. त्यामुळेच त्यांची गच्छंती केली गेली आहे. बडोले आणि कांबळे हे दोघेही कोरेगाव भीमा दंगलीचे बळी ठरले आहेत, असे मेश्राम म्हणाले. दरम्यान, 29 जानेवारी रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?