#SlowMotion : भारत सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित… दिशा पाटणीचे स्टंट आणि सलमानचा लुक हिट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खानचा आगामी सिनेमा भारतचा ट्रेलर नकुताच प्रदर्शित झाला आहे. यानंतर आता या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. स्लो मोशन असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर सलमान खान आणि दिशा पाटणी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सकर्सच्या पार्श्वभूमीवर हे गाणं चित्रीत झाल्याचं दिसत आहे. यात सलमान आणि दिशाची केमिस्ट्री सर्वांना आडवत आहे.

या गाण्यात सलमान रेट्रो लुकमध्ये दिसत आहे तर दिशा पाटणी पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये थिरकताना दिसत आहे. दिशाचा लुक खूपच हॉट दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे यात दिशा पाटणी स्टंट करताना दिसत आहे. दिशाचा हा लुक पाहिल्यानंतर कतरीना कैफच्या चिकणी चमेली या गाण्याची आठवणही होते. हे गाणं प्रदर्शित होण्याआधी याचा टीझर लाँच करण्यात आला होता. यानंतर आता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

सलमानने हे गाणं प्रदर्शित करताना एक ट्विटही केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, “आजा डूब जाऊं तेरे आँखो के ओशन मे, स्लो मोशन में” असं सलमानने म्हटलं आहे. इर्शाद कामिल यांनी हे गाणं लिहिलं आहे. नक्ष अझिज आणि श्रेया घोषाल यांनी हे गायलं असून विशाल-शेखर या जोडीने याला संगीत दिलं आहे.

दरम्यान भारत हा सिनेमा या ईदला म्हणजेच 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. “Ode To My Father’ या दक्षिण कोरियन सिनेमावर आधारीत भारत हा सिनेमा आहे. हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सलमान खानशिवाय कतरीना कैफ, दिशा पाटणी, सुनील ग्रोवर, तब्बू, जॅकी श्रॉफ हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.