मंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा

मुंबई : वृत्‍तसंस्था – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात मंत्री असलेल्या खा. रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी रावसाहेब दानवे यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती. दानवे यांचा विजय देखील झाला. मात्र, त्यांचे जावाई हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि तेथे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला.

 

खैरे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप केला. त्यानंतर वातावरण तापले. तेव्हापासुन प्रदेशाध्यक्षपदाची माळ दुसर्‍या नेत्याच्या गळयात पडणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, आज रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती एएनआय या वृत्‍तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी वेगवेगळया नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनमा दिला असला तरी ते केंद्रात मंत्री असणार आहेत. दरम्यान रावसाहेब दानवे यांनी राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या