‘माझ्या पदवीची भाजपनं चिंता करू नये’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या पदवीची चिंता भाजपने करु नये, मला पुण्यात शिकायला मिळाले याचा माला अभिमान आहे. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना असल्या फालतू विषयांवरून त्यांच्यावर टिका करू नका, खात्यात काम कसे करतो आहे ते पहा असा सल्ला दिला आहे. याकडे भाजपने लक्ष द्यावे असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर पदवीवरून टीका करणाऱ्या भाजपला दिला आहे.

मंत्रिपद स्विकारल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या पक्षाने मंत्री केले त्या पक्षाच्या शाखांना, जिल्हा कार्यलयाला भेट देणे, कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानुसार मी इथे आलो आहे. माझ्या पदवीवरून टीका होत आहे. मात्र, मला त्याचा अभिमान आहे. दुसरी गोष्ट अशी की मी ती पदवी लपवलेली नाही हेही त्यांनी लक्षात ठेवावे. उलट मला पुण्यात शिकायला मिळाले याचा अधिक आनंद आहे.

कोकण विद्यापीठाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तुम्ही त्याच विभागातील आहात, आता या प्रस्तावाला गती मिळेल का यावर संमती.  सोलापूर येथील 38 महाविद्यालयांसाठी विद्यापीठ होऊ शकते तर कोकणात तेथील महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ का नको ? ते व्हायलाच पाहिजे. कदाचित त्यामुळेच माझ्याकडे उच्च शिक्षण विभाग आला असावा. कोकण विद्यापीठ प्रत्यक्षात यावे यासाठी मी प्रयत्न करणारच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/