Bharatiya Samatawadi Party | भारतीय समतावादी पार्टीच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 15 जणांचा महात्मा बसवेश्वर क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मान

पुणे / पिंपरी – Bharatiya Samatawadi Party | राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक शिक्षिका व खेळाडू यांचा भारतीय समतावादी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे नेते, उद्योजक आणि सामजिक कार्यकर्ते दिलीप पांढरकर, फिरोज शेख, राज पाटील, सूर्यकांत मुळे, निवृत्ती काळभोर, गणेश मगर, भुजंग दुधाळे इत्यादी उपस्थित होते.

फिरोज शेख यांनी क्रीडा शिक्षकाला खेळाडू घडविताना किती परीश्रम घ्यावे लागतात यावर प्रकाश टाकुन विजेत्यांचे अभिनंदन केले. सूर्यकांत मुळे यांनी निरोगी आयुष्या साठी खेळाचे किती महत्त्व आहे याबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बसवराज कनजे यानी सत्कार करण्यामागील उद्देश हा मेहनती क्रीडापटुंचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे असे सांगितले. विशेष बाब म्हणजे यावेळी क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामधे सहभागी झालेल्या रक्तदात्यांना गौरविण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतीय समतावादी पार्टीच्या वतीने खालील शिक्षकांचा व खेळाडूचा महात्मा बसवेश्वर क्रीडा गौरव पुरस्काराने सत्कार करण्यात आला

पुरस्कार क्रमांक

1) निलकंठ कांबळे

2) सीमा चव्हाण

3) यश जाधव

4) प्रशांत रणखांब

5) स्नेहा कुंदप

6) ऋचा पाचपांडे

7) बाळासाहेब हेगडे

8) उमा काळे

9) ईश्वरी फपाळ

10) गजानन आळगड्डे

11) रेणू शर्मा

12) सुष्टी सरमाने

13) निखिल पवार

14) संपदा कुंजीर

15) स्तुती हुंद्रे

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी अनंत सिंदाळकर, विलास शेटकार, सिध्दु नावदगेरे, संगमेश्वर शिवपुजे, चंद्रकांत खोचरे, अभिजित हांचे, शिवानंद घाटके आणि शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे राजकुमार माळी, अभिषेक कदम, हर्षदा नळकांडे, मनिषा पाटील, आशिष मालुसरे, यांनी परिश्रम घेतले. कार्यकमाचे सूत्र संचालन महादेव फपाळ व सुनिता नगरकर यांनी केले. सुधाकर कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हे देखील वाचा

Vijay Vadettiwar | ‘दारूची दुकानं सुरू, मंदिरं बंद का? भाजपच्या सवालावर मंत्री वडेट्टीवारांचे उत्तर; म्हणाले…

Anti Corruption | 1.20 लाखाची लाच घेताना तहसीलदार आणि शिपाई अँटी करप्शनच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Bharatiya Samatawadi Party | Mahatma Basaveshwar Sports Honors Award (Video) at pimpri chinchwad pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update