Bharatiyam 2023 | ‘भारतीयम २०२३’ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद ! भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यशस्वी आयोजन

पुणे : Bharatiyam 2023 | भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘भारतीयम २०२३’ या वार्षिक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये २७ मार्च ते १ एप्रिल दरम्यान या महोत्सवाचे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. (Bharatiyam 2023)
त्यामध्ये रिगाटा,रोबोरेस,स्पर्धा,लेव्हल अप,व्हर्चुअल मॅट्रिक्स अशा तंत्रज्ञानविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय गांधी यांच्या हस्ते २७ मार्च रोजी महोत्सवाचे उदघाटन झाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे विभागीय व्यवस्थापक ऋषिकेश धांडे,भारती विद्यापीठाचे सहसचिव डॉ.के.डी.जाधव,रजिस्ट्रार डॉ.जी.जयकुमार,प्रा.नरेंद्र मोहपात्रा,प्रा.डॉ.सचिन चव्हाण,प्रा.डॉ. सुनीता जाधव,डॉ.प्रमोद जाधव,डॉ.सुधीर कदम,प्रा.गजानन भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विदुला सोहोनी यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीची आणि महोत्सवाची माहिती दिली.’जिनर’ या नियतकालिकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.डॉ.सचिन चव्हाण यांनी स्वागत केले. डॉ.प्रमोद जाधव यांनी आभार मानले. (Bharatiyam 2023)
डॉ.संजय गांधी म्हणाले,’हे जग नवसंकल्पना,संशोधन आणि स्टार्ट अपचे आहे.नव्या संकल्पनांना वाव मिळत आहे.
विद्यार्थ्यांनी नव्या संकल्पना मनात घोळवत त्या प्रत्यक्षात उतरविल्या पाहिजेत.
उद्योजक बनण्यासाठी भारतातील परिस्थिती पोषक आहे,
त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता नवीन उद्योजकीय संकल्पनांकडे लक्ष दिले पाहिजे’.भारतीयम २०२३ महोत्सवातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. डॉ.जी.जयकुमार,डॉ.के.डी. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
Web Title :- Bharatiyam 2023 | ‘Bharatiyam 2023 ‘ festival of Bharati Vidyapeeth College of Engineering Held
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या