Budget 2019 : ‘भारतमाला’च्या माध्यमातून बनणार ‘महामार्ग’ तर ‘सागरमाला’द्वारे वाढणार ‘पोर्ट कनेक्टिव्हिटी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की केंद्र सरकार चा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘भारतमाला’ च्या माध्यमातून रस्ते आणि महामार्गांची उभारणी करण्यात मदत करणार असून ‘सागरमाला’ प्रोजेक्ट च्या माध्यमातून ‘पोर्ट कनेक्टिविटी’ म्हणजेच देशातील विविध बंदरांना आपापसात जोडण्यासाठी काम केले जाईल. या दोनही प्रकल्पांची सुरुवात पाच वर्षांपूर्वी रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी केली होती.

एविएशन फाइनांस सेक्टर(उड्डाण गुंतवणूक क्षेत्र) मध्ये उतरणार भारत :

अर्थमंत्र्यांनी म्हटले की,’आता भारताने एविएशन फाइनांस सेक्टर मध्ये उतरण्याची वेळ आली आहे. कारण विमानप्रवासाने सर्वसामान्य माणसाला एयर कनेक्टिविटी प्रदान करत जगाशी जोडले आहे. या सर्व योजना शहरे आणि गावांतील अंतर कमी करत आहेत. याचबरोबर त्यांनी हेदेखील सांगितले की भाड्याच्या घरांमध्ये राहण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आहि नवीन सुधारणा देखील लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

UDAY योजना चालू राहणार :

अर्थमंत्र्यांनी म्हटले की,’सरकारने डिस्कॉम मध्ये आर्थिक आणि कार्यकारी व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी २०१५ मध्ये UDAY (Ujjwal DISCOMS Assurance Yojna) लागू केली होती. ही चालू ठेवणार असून तिच्यात सुधारणा करण्याचा विचार आहे.’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय