लॉकडाऊनमध्ये बेरोजगार युवतीला दाखवलं नोकरीचं आमिष, मुलाखतीत ‘गोड-गोड’ बोलून केला ‘बलात्कार’

पोलिसनामा ऑनलाईन, भरतपूर, दि. 14 सप्टेंबर : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन लावल्यामुळे आर्थिक अडचण भासू लागली. याचवेळी राजस्थानच्या भरतपूरमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तिला मुलाखतीला बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे.

पीडित 23 वर्षीय तरुणी एका कारखान्यामध्ये नोकरीला होती. कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात तिची नोकरी गेली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पीडित तरुणी ही मूळची हरयाणा राज्यातील आहे. जयपूरमध्ये ती राहत असून एका कारखान्यात ती नोकरी करत होती. कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कारखाने बंद पडले. त्यामुळे तिची नोकरी गेली. ती बेरोजगार झाली. बरेच दिवस ती नोकरीच्या शोधात होती. भरतपूरमध्ये नोकरी असल्याचे तिला कळलं. तिने संबंधित व्यक्तीला नोकरीबाबत फोन केला. त्याने मुलाखतीला बोलावले. यावेळी त्याने बेरोजगार तरुणीवर बलात्कार केला.

संशयित आरोपी भरतपूरच्या बयाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत आहे. अशोक मीणा असे त्याचे नाव आहे.

पीडित तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून १० सप्टेंबरला तिला मुलाखतीसाठी जयपूरहून भरतपूरला बोलावले. सेंट्रल बस स्थानकातून अशोक तिला दुचाकीवरून घेऊन गेला. यावेळी त्याने मुलाखत संध्याकाळी असल्याचे त्याने सांगितले. तोपर्यंत देवदर्शन करून येऊ, असे सांगितले.

दर्शन घेऊन परतल्यानंतर अशोक पीडित तरुणीला इंदिरानगर कॉलनीतील एका घरात घेऊन गेला. तिथे त्याने पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला एका बसमध्ये बसवून जयपूरला पाठवले. मात्र, पीडित तरुणी पुन्हा भरतपूरला आली. पीडित तरुणीने महिला पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.