Airtel च्या 5G स्पीडने सर्वांना केले आश्चर्यचकित, इतक्या सेकंदमध्ये डाऊनलोड झाला पूर्ण चित्रपट

गुवाहाटी : एयरटेलचे 5जी इंटरनेट स्पीड आश्चर्यचकित करणारे आहे, कारण अवघ्या काही सेकंदात एक संपूर्ण चित्रपट डाऊनलोड झाला. यासोबतच कंपनीने 5जी नेटवर्कची घोषणा केली आहे आणि हैद्राबादमध्ये कमर्शियल पद्धतीने 5जी सेवेचे यशस्वी सादरीकरण केले. भारती एयरटेल देशातील पहिली टेलीकॉम कंपनी बनली आहे जिच्याकडे 5जी नेटवर्क उपलब्ध आहे. एयरटेलने सध्याच्या लिबरालाइज्ड स्पेक्ट्रमला 1800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए नॉन स्टँड अलोन नेटवर्क तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले आहे.

एयरटेल 5जी नेटवर्कच्या टेस्टिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये समजते की, 5जी मोडमध्ये 10 पट जास्त स्पीड मिळत आहे. टेस्टच्या दरम्यान हैद्राबादमध्ये 1 जीबीची फाइल केवळ 30 सेकंदमध्ये डाऊनलोड झाली. याशिवाय संपूर्ण चित्रपट सुद्धा काही सेकंदात डाऊनलोड झाला. एका चित्रपटाचा आकार सुमारे 750 ते 800 एमबी असतो आणि टेस्टिंगच्या स्पीडच्या हिशेबाने हा 20 ते 25 सेकंदात पूर्ण चित्रपट डाऊनलोड होऊ शकतो.

एयरटेल 5जीच्या टेस्टिंगदरम्यान इंटरनेटचा स्पीड खुप चांगला होता आणि या दरम्यान डाऊनलोड स्पीड 310 एमबीपीएसचा होता. तर लाइव्ह टेस्टिंगच्या व्हिडिओवरून समजले की, 5जी मोडमध्ये अपलोडचा स्पीड 65 एमबीपीएस होता.

आगामी काळ मोबाइल नेटवर्कच्या पाचव्या पीढीचा म्हणजे 5जीचा आहे. हा 4जी नेटवर्कच्या तुलनेत खुप वेगवान मानला जात आहे. असे म्हटले जात आहे की, यामुळे जगात मोठा बदल होणार आहे. 4जी नेटवर्कवर जिथे सरासरी इंटरनेट स्पीड 45एमबीपीएस असते. तर 5जी नेटवर्कवर हे स्पीड वाढून 1000 एमबीपीएसपर्यंत पोहचू शकते. यासाठी छोटे-छोटे खुप अँटीना लावले जातील ज्याद्वारे इंटरनेटचे जग पूर्णपणे बदलून जाईल.