Airtel ची दिवाळी भेट ! युजर्सला Free मिळतेय ‘ही’ खास मेंबरशिप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपनी एअरटेलनं (Airtel) आपल्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड युजर्सना फ्रीमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशिप ( Disney+HotStar VIP Membership) देण्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचं अॅप एअरटेल थँक्स ( Airtel Thanks) वरून युजर ही मेंबरशिप मिळवू शकतात. एअरटेल वेबसाईटच्या माहितीनुसार, 499 रुपयांच्या पोस्टपेड किंवा 999 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ब्रॉडबँड प्लानच्या युजर्सना या ऑफरचा लाभ मिळू शकतो.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर सध्या काही निवडक ग्राहकांना दिली जात आहे. जर तुम्ही एअरटेलचे पोस्टपेड किंवा ब्राडबँड ग्राहक असाल तर तसंच या संबंधी तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशिप मिळाली की नाही हे तपासायचं असेल तर एअरटेल थँक्स अॅपवर जावं लागेल. ग्राहक प्रत्येक पोस्टपेड किंवा ब्रॉडबँड प्लॅनसाठी एकदाच या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. इतकंच नाही तर प्लॅन जर होल्डवर ठेवला तर तुमची मेबरशिप बंद केली जाईल.

Airtel चा 499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

यात तुम्हाला 75 जीबी डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस (SMS) मिळतात. यात अमेझॉन प्राईम (Amazon Prime) आणि एअरटेल एक्स्ट्रिम (Airtel Xstream) मेंबरशिप दिली जाते.