पोलीसनामा ऑनलाईन टीम : Bharti Singh – Harsh Limbachia | कॉमेडियन (Comedian) भारती सिंग आणि पती-होस्ट-लेखक हर्ष लिंबाचिया यांच्याविरुद्ध एनसीबीने (NCB) आरोपपत्र दाखल केले आहे. ड्रग्जप्रकरणी (Drugs) त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध न्यायालयात 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या दोघांना 2020 मध्ये NCB कडून अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही (Bharti Singh – Harsh Limbachia) जामिनावर (Bail) बाहेर आहेत. NCB ने ड्रग प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि सारा अली खानसह (Sara Ali Khan) अनेक मोठ्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती.
याच दरम्यान NCB ने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापा (Raid) टाकला. या छाप्यामध्ये भारती आणि हर्षच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हि कारवाई करण्यात आली होती.
यानंतर NCB ने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांना न्यायालयात हजर केलं होतं आणि त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
यानंतर त्यांना 15 हजार रुपयांची सिक्युरिटी मनी जमा केल्यानंतर दोघांना जामीन देण्यात आला होता.
तेव्हापासून दोघेही जामिनावर बाहेर आहेत. मात्र, फिर्यादीचे म्हणणं न ऐकता जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा एनसीबीकडून करण्यात आला होता.
भारती सिंग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत विविध आऊटफिट्समध्ये आपलं फोटोशूट करत असते.
तसेच भारती आपले विविध विनोदी रिल्स शेअर करत असते. मुलाला जन्म दिल्यानंतर भारती आणि हर्ष प्रचंड आनंदी आहेत.
Web Title :- Bharti Singh – Harsh Limbachia | bharti singh harsh limbachia in trouble ncb took big action in drugs case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण
Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून धोका? सुरक्षेत वाढ
BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही