Video : ‘कॉमेडीयन’ भारती सिंह पुन्हा एकदा ट्रोल ! लोक म्हणाले – ‘ड्रग्ज…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॉमेडीयन भारती सिंह (Bharti Singh आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना ड्रग्ज प्रकरणी अटक झाली होती. सध्या दोघंही जामीनावर बाहेर आहेत. बाहेर आल्यानंतर दोघं सतत चर्चेतही येताना दिसले. अशात भारतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळं ती ट्रोल होत आहे.

सध्या सोशलवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दिसत आहे की, भारती सिंह एका चारचाकीत बसली आहे. ती सॅनिटायजरनं तिचे हात स्वच्छ करत आहे. सॅनिटायजरचा वापर कसा करावा हे ती यावेळी सांगत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

सध्या हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. काहींनी म्हटलं आहे की, हे ड्रग्ज नाहीये, सॅनिटायर आहे. एकानं असंही म्हटलं आहे की, ती सॅनिटायजर का पित आहे. त्याला ड्रग्ज तर समजत नाही ना. काहींनी तर गेट लॉस्टही म्हटलं आहे. काहींनी तिला नशेडी म्हणून ट्रोल केलं आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) कॉमेडीयन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. दि 22 नोव्हेंबर (वार- रविवारी) किला कोर्टानं भारती आणि हर्ष यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांकडून जामीन अर्जही दाखल करण्यात आला होता ज्यावर दि 23 नोव्हेंबर रोजी (वार सोमवार) सुनावणी झाली. या सुनावणीनंर भारती आणि हर्ष यांचा जामीन एनडीपीएस कोर्टानं मंजूर केला होता. जामीनावर सध्या दोघं बाहेर आले आहेत. एनसीबीच्या छापेमारीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरी 86.50 ग्रॅम गांजा मिळाला होता.