‘पुडीया का नशा उतरा नहीं अभी तक…’ भारती झाली मास्कमुळे ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. देशातील अनेक राज्यांतील आरोग्य प्रशासन सुविधांच्या कमतरेमुळे बेजार झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देखील दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत तर 1100 पेक्षा जास्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

दरम्यान कॉमेडियन भारती सिंहने देखील लोकांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले पण भारतीने स्वत: मास्क लावले नसल्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारती सिंहचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती एका व्यक्तीला मास्क लावताना सांगत आहे पण स्वतः मात्र बिना मास्क ची फिरत आहे.