पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! भेसळयुक्त तुपाचे 100 डब्बे ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंबेगाव भागातील अभिनव कॉलेज समोरून सुमारे १०० डब्बे तूप घेऊन जाणारा टेम्पो पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना संशय आला. त्यांनी तो टेम्पो चेक केला. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली. चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. परिणामी, हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबरला आंबेगाव परिसरातील अभिनव कॉलेज जवळ मी व माझे सहकारी पेट्रोलीग करीत होतो. यावेळी आमचे कर्मचारी राहुल तांबे व सचिन पवार यांना या भागातून भेसळ युक्त तूप जात असल्याची माहिती मिळाली. काही गाड्याची चेकीग केल्यानंतर एक मेगा एक्सल कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच १२ आर एन २४५० टेम्पो आम्ही थांबवला. यामध्ये कुठलाही मार्क, कपनीचे नाव नसलेले सुमारे १०० डब्बे तूप आढळले. गाडी चालक शिवराज हळमणी (रा. हत्तीकनबस, ता. अक्कलकोट, जि . सोलापूर) याने हा माल डीजीएम (देवक फुड्स कंपनी ) शिवणे येथील कंपनीतून घेतला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अन्न औषध प्रशासनाला याची माहिती कळवली. या विभागातील क्रांती बारवकर यांनी पाहणी करून हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याची खात्री केली.या कारवाई मध्ये सुमारे १४९९ किलो गायीचे तूप किमत अंदाजे साडेचार लाख रुपये पोलिसांनी जप्त केलं आहे.

दरम्यान, ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस कर्मचारी संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रविंद्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांनी केली.