कात्रजमध्ये जुगार अड्ड्यावर भारती विद्यापीठ पोलिसांचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कात्रज येथील अंजनीनगरमध्ये इमारतीच्या टेरेसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकला असून याप्रकरणी पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलीसांनी दहा हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनिल बाळासाहेब कदम (४२, कात्रज), चंद्रकांत रघुनाथ खुंटे (३९, रा.कात्रज), विशाल अरुण ओव्हाळ (३७, रा. कात्रज गावठाण), पुनाजी बापूराव चौधरी (४८), गणेश राम मोरे (३२), दत्तात्रय गुलाबराव जाधव (५०), गणेश राम मोरे (३२), हेमंत संभाजी खैरे (३८), रामेश्वर गजानन लवटे(३४), निवृत्ती ग्यानबा उम्रटकर(४८), एकनाथ दत्तात्रय अहिरे (३८), रामदास दत्तात्रय दिवेकर (५७), सुनील बाळासाहेब कदम (४०), संतोष साहेबराव निकम (३८), प्रदिप वसंतराव डावरगावे (२७, रा. सर्व कात्रज) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई योगेश अरुण सुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील अंजनीनगर येथे अशलेल्या कदम चाळीच्या टेरेसावरील खोलीमध्ये अनिल कदम हा जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हणे, सहायक पोलीस निरीक्षक डी. आर. मदने व कर्मचाऱ्यांच्या पथकाने तेथे छापा टाकून पंधरा जणांना अटक केली. तर तेथून रोख रक्कम, व जुगार खेळण्यासाठी लागणारे १० हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. आर. मदने करत आहेत.