Bharti Vidhyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रीय आंतर तंत्रनिकेतन वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पुणे : भारती विद्यापीठाचे (Bharti Vidhyapeeth) संस्थापक लोकनेते डॉ. पतंगरावजी कदम (Dr Patangrao Kadam) यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला वाव मिळावा म्हणून राष्ट्रीय आंतर तंत्रनिकेतन ववक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 मार्च 2023 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 36 तंत्रनिकेतन मधील 61 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन पुणे चे विद्यार्थी कु. अवधूत नुला ने प्रथम क्रमांकाचे व कु. मृदुल शहा ने हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले (Pune News). कु. आरती काशीद, राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस ची विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. याशिवाय ध्येयजा पेटकर, अभिषेक कोळी, यश साखरवडे आणि वैभव होके या चार विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. (Bharti Vidhyapeeth)

ज्येष्ठ सिनेअभिनेते संजीव मेहेंदळे (Veteran Film Actor Sanjeev Mehendle) यांनी पारितोषिक वितरण
समारंभाचे अध्यक्ष पद भूषविले व आपल्या अमोघ वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेते मंगेश दिवाणजी व अभिनेत्या डॉ. प्रचिती सुरू-कुलकर्णी यांनी काम केले.
सर्व विजय स्पर्धकांचे तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री. राजेंद्र उत्तुरकर यांनी अभिनंदन केले. (Bharti Vidhyapeeth)

या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक प्रा. महारुद्र कापसे यांनी आभाप्रदर्शन केले व सूत्रसंचालन केले.
या स्पर्धेचे सहसंयोजक प्रा. निलेश पांगरे यांनी निकाल वाचन केले. या स्पर्धेचे उत्तम सूत्रसंचालन कू. तेजस्विनी
शिंदे व कू. अनिकेत पवार यांनी केले.

Web Title :   Bharti Vidhyapeeth | National Inter Tanrniketan Elocution Competition concluded at Jawaharlal Nehru Tanrniketan of Bharti Vidhyapeeth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dnyanoba Tukaram Award | सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, स्वामी श्री गोविंददेव गिरी, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्रदान

Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण