Bhasha Sangam Mobile App | मोबाईलमधून ‘मोफत’ शिकू शकता देशातील 22 वेगवेगळ्या भाषा, टेस्ट पास झाल्यावर सरकारकडून मिळेल ‘प्रमाणपत्र’

नवी दिल्ली – Bhasha Sangam Mobile App | देशातील लोकांचे भाषेचे ज्ञान वाढवण्यासाठी सरकारने एक मोबाईल अ‍ॅप (mobile app) बनवले आहे. या अ‍ॅपचे नाव ‘भाषा संगम’ (Bhasha Sangam Mobile App) आहे. सरकारचा महत्त्वकांक्षी उपक्रम एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत हे मोबाईल अ‍ॅप बनवले आहे. हे अ‍ॅप एकदम मोफत आहे आणि कुणीही व्यक्ती आपल्या मोबाईल फोनमध्ये ते डाऊनलोड करून वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो.

 

खेळता-खेळता भाषा शिका

या अ‍ॅपमध्ये देशातील 22 भाषा (22 languages) आहेत. ज्या शिकता आणि वाचता येऊ शकतात. यात भाषा शिकण्यासाठी खेळांचा आधार घेतला आहे. अर्थात अ‍ॅपवर खेळता खेळता भाषा शिकता येऊ शकते.

 

भाषा शिका एकदम मोफत

हे अ‍ॅप पूर्णपणे ऑनलाईन लँग्वेज लर्निंग अ‍ॅप आहे. ते मोबाईल युजरला वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी सुविधा देते. अ‍ॅपमधील जी भाषा शिकायची आहे, ती शिकू शकता. यामध्ये भारतातील 22 अधिकृत भाषा देण्यात आल्या आहेत. ज्या शिकणे एकदम मोफत आहे. (Bhasha Sangam Mobile App)

 

या आहेत त्या 22 भाषा

या बावीस भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, संथाली, मैथीली आणि डोगरी या भाषांचा समावेश आहे. हे अ‍ॅप भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केले आहे.

 

राज्यांची संस्कृती जाणून घ्या

या भाषा मोबाईल अ‍ॅपद्वारे भाषा, भाषेतील शब्द आणि वाक्य शिकता येऊ शकतात. भाषेशिवाय वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीबाबत माहिती मिळू शकते.

 

भाषा संगम मोबाईल अ‍ॅपची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊयात…

– गेम प्रमाणे हे मोबाईल अ‍ॅप बनवण्यात आले आहे.

– यावर भाषा सहजपणे शिकता येईल.

– प्रत्येक दिवशी प्रगती तपासण्यासाठी डेली प्रॅक्टिस सिस्टीम आहे.

– चित्रांच्या आधारे भाषेचे ज्ञान दिले जाईल.

– देशातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणे आणि समजण्यासाठी 44 युनिक कॅरेक्टर बनवले आहेत.

– 500 कल्चरल टिप्स दिल्या आहेत. त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत यामुळे आपल्याला आपली संस्कृती समजून घेता येते.

– प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर ताबडतोब फिडबॅक मिळण्याची व्यवस्था आहे.

– प्रोग्रेस जाणून घेण्यासाठी प्रत्येक धड्यानंतर स्टार स्कोअर जाणून घेता येतो.

– तुम्ही किती शिकत आहात, आणि प्रगतीच्या आधारावर मिळालेल्या स्टार रेटिंगच्या आधारावर सरकारकडून प्रमाणपत्र दिले जाते.

– भाषा शिकताना स्वतः आपली टेस्ट घेऊ शकतात आणि त्या आधारावर ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवू शकता.

– हे अ‍ॅप देशातील एका स्टार्टअप मल्टी लँग्वेजने तयार केले आहे.

– शाळकरी मुलांना विशेष प्रकारे संविधानात दिलेल्या वेगवेगळ्या भाषांबाबत माहिती देणे आहे हा यामागील उद्देश आहे.

 

Web Title :- Bhasha Sangam Mobile App | bhasha sangam mobile app to learn 22 different languages by online language learning

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा