Bhaskar Jadhav | शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, शिवसेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधवांविरोधात FIR

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde Group) आणि भाजप (BJP) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवर वाढत चालला आहे. हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत. कारण शिवसेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल (FIR) करण्यात आली आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप राज्यात दंगल (Riot) पेटवेल असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात (Guhagar Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) यांच्यात दंगल पेटवेल, असं वक्तव्य जाधव यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. भास्कर जाधव यांचे वक्तव्य निराधार आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे (Nilesh Surve) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

 

काय म्हणाले होते भास्कर जाधव?

40 आमदार फोडून देखील लोकांचा आपल्याला पाठिंबा नाही हे भाजपच्या लक्षात आलं आहे.
त्यामुळे आता भाजप दोन समूहात दंगल भडकवण्याचा प्रयत्न करेल.
वाट्टेल ते झालं तरी मुस्लिम तरुणांनी डोकं शांत ठेऊन
भाजपचा डाव ओळखून मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation (BMC)
पुन्हा शिवसेनेला सत्तेत आणू असं आवाहन भास्कर जाधव यांनी मुस्लिम समुदायाला केलं.

 

Web Title :- Bhaskar Jadhav | bjp police complaint against shivsena leader
bhaskar jadhav over his controversial statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा