Bhaskar Jadhav | आमदार नितीन देशमुख यांच्यावर मुद्दाम गुन्हा दाखल केला – भास्कर जाधव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे पडसाद आज विधीमंडळात पहायला मिळाले. ‘तू आतमध्ये ये, तुला गेटवरच अटक करतो’ असा धमकीवजा इशारा पोलिसांनी आमदार नितीन देशमुखांना दिला असल्याचा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. सभागृह चालू असताना ३५३ अ अंतर्गत कारवाई आमदार नितीन देशमुखांवर केली असून हा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आमदार नितीन देशमुख हे रवी भवन येथील बंगल्यावर २०० जनांची गर्दी घेऊन चालले होते.
येणाऱ्या सर्वांचे पास तयार करावे लागतील असे पोलिसांनी त्यांना सांगितले.
यावर नितीन देशमुख आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना दमदाटी केली मात्र हा
गुन्हा मुद्दाम दाखल करण्यात आल्याचा आरोप आमदारांकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे या प्रकरणात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात येईल.’(Bhaskar Jadhav)

नेमके घडले काय?

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कांबळे यांची ड्युटी रवी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लागली होती.
कांबळे हे रवी भवन येथे येणाऱ्या व्यक्तींचे पासेस चेक करून त्या व्यक्तींना आत प्रवेश देत होते.
मंगळवारी (ता. 27 डिसेंबर) सायंकाळी आमदार देशमुख यांनी हाताने धक्का देऊन जबरदस्तीने त्यांच्यासोबत
असलेल्या काही लोकांना घेऊन विनापास रवी भवनच्या आतमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे नितीन देशमुख व त्यांच्यासोबतच्या साथीदारांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार कांबळे यांनी सदर पोलीस ठाण्यात दिली होती.
यानंतर आमदार नितीन देशमुखांसह अन्य लोकांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कांबळेंनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आमदार नितीन देशमुख यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप करणे,
सरकारी कर्मचाऱ्यांशी बोलताना अपशब्द वापरणे त्यांना शिवीगाळ करणे याबाबत भादंवि संहिता कलम ३५३, १८६,
४४८, २९४, ५०६ आणि ३४ अंतर्गत नागपुरातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :-  Bhaskar Jadhav | it is claimed that mla nitin deshmukh was threatened to be arrested by the police officer in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | अजित पवार मोबाईल बंद ठेवून ८-८ दिवस गायब होतात; अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे पलटवार…

Devendra Fadnavis | ‘हा पहिलाच विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातले घोटाळे बाहेर काढत आहे’, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला (व्हिडिओ)