Bhaskar Jadhav | नारायण राणेंविरोधात शिवराळ भाषा वापरणं भास्कर जाधवांना भोवणार?, कुडाळ पोलीस ठाण्यात FIR

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे (BJP leader Narayan Rane) यांच्याबद्दल अपमानास्पद, शिवराळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात (Kudal Police Station) आयपीसी 153, 505(1)(क), 500, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील पणदुर ग्रामपंचायतीचे सरपंच तुकाराम चंद्रकांत साईल Tukaram Chandrakant sail(वय-41) यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने त्यांना नारायण राणेंशी घेतलेला पंगा भोवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, कुडाळ येथे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्यावरील एसीबी कारवाईच्या विरोधात एसीबी (ACB) कार्यालयावर ठाकरे गटाने मोर्चा काढला होता.
सदर मोर्चाच्या वेळी भाजप नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरुन तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर
वक्तव्ये शिवसेना नेते करणार याची पूर्वकल्पना आल्याने आपणास कालच आम्ही त्यासंबंधी सूचना लेखी तक्रार
अर्जाद्वारे केली होती. तरीही आजच्या मोर्चात भाषणे करताना भाजप नेत्यांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची आक्षेपार्ह
शिवराळ गलिच्छ भाषा वापरण्यात आलेली आहे.

तक्रारीत म्हटले की, याबाबतची माहिती पोलिसांना आपल्या यंत्रणेद्वारे, तसेच मीडियावरुन मिळाली असेलच.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यासपीठावरुन जाहीरपणे शिवीगाळ करत बदनामी करणारी आणि खालच्या दर्जाची अत्यंत आक्षेपार्ह अशी शिवराळ भाषा वापरली आहे.
या प्रकाराने भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय संतापाची लाट निर्माण झाली आहे.

दरम्यान, या मोर्चात पेटती मशाल आणि ज्वलनशील पदार्थ घेऊन शासकीय कार्यायावर चाल करुन जाण्याचा ठाकरे सेनेचा प्रकार हा अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांच्या निर्दर्शनास आणून देण्यात आले आहे.

Web Title :- Bhaskar Jadhav | narayan rane vs bhaskar jadhav complaint filed against mla bhaskar jadhav in kudal police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा