Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये (Rebel MLA) सभा घेऊन बंडखोरांचा समाचार घेत आहेत. नुकतीच उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली होती. यावेळी त्यांनी शिंदे गट (Shinde Group) आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्याच ठिकाणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा (CM Eknath Shinde Khed Ralley) होत आहे. सभेपूर्वी खेडमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या बॅनरची चर्चा रंगली आहे. (Bhaskar Jadhav On Ramdas Kadam)

 

ज्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. सभेसाठी मागील काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरु आहे. अशातच रामदास कदम यांच्या एका बॅनरची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. ‘विरोधकांच्या मनात नुसती आग कारण मैदानात उतरला आहे, ढाण्या वाघ, करारा जबाब मिलेगा’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी रामदास कदम यांची खिल्ली उडवत टोला लगावला आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते. (Bhaskar Jadhav On Ramdas Kadam)

ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम
भास्कर जाधव म्हणाले, ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम, करारा जबाब देण्यासाठी तुमच्या दम असायला लगतो. 2009 साली कदमांचा पराभव मी नाहीतर उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप ते करत आहेत. दुसरं, योगेश कदमांची (Yogesh Kadam) राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, रामदास कदम हे एका मतदारसंघापुरते मर्यादीत आहेत. हे काय करारा जबाब देणार, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

 

बेडूक कितीही फुगला तरी…
बेडूक कितीही फुगला तरी तो काय डोंगर किंवा बैल होत नाही.
रामदास कदम नावाचा बेडूक किंवा शिंदे गट कोकणात बोलून फुगेल.
निवडणुकीच्यावेळी लोक हळूच टाचणी लावून हा फुगा फोडतील, अशी टीका जाधव यांनी केली.

 

Web Title :- Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | bhaskar jadhav attacks ramdas kadam over khed cm eknath shinde sabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑनलाईन जुगार घेणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 7 जणांवर कारवाई

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त