Bhaskar Jadhav on Ravi Rana | ‘कोण हा फडतूस राणा?, बाळासाहेबांनी तुझ्यासारख्या माणसाला…’; भास्कर जाधव रवी राणांवर संतापले!

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Bhaskar Jadhav on Ravi Rana | आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि शिवसेनेमध्ये मोठा वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) नेते, आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav on Ravi Rana) यांनी रवी राणा यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

 

कोण हा फडतूस रवी राणा?, कुठे होता. बाळासाहेब ठाकरे यांनी तुझ्यासारख्या माणसाला कधीच शिवसैनिक केला नसता. जर हनुमान चालिसा वाचून परिस्थिती बदलणार असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाच म्हणजे त्यांनी जे 15 लाख रूपये देण्याचं आश्वासन तरी पूर्ण होईल, असं म्हणत भास्कर जाधव यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला.

 

शिवसेनेची काळजी कशाला करतोस तू भाजप समर्थक आहेस ना. बाळासाहेबांच्या मनात काय आहे ते तुझ्यासारख्या फडतूस माणासाने सांगण्याची गरज नसल्याचं जाधव म्हणाले. त्यासोबतच जाधव यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्यावरही भाष्य केलं.

 

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला हा संशोधनाचा (Research) विषय आहे.
रवी राणा आणि किरीट सोमय्यांचे काय संबंध आहेत.
कारण रात्री 10 वाजता सोमय्या पोलीस ठाण्यामध्ये का गेले हे आधी महाराष्ट्राला सांगा?,
असा सवाल करत जाधवांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे राणा दाम्पत्याला आज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली आहे.

 

Advt.

Web Title :- Bhaskar Jadhav on Ravi Rana | shivsena leader bhaskar jadhav slap ravi rana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा