Bhaskar Jadhav | ‘रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा…’, भास्कर जाधवांचा इशारा

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूनमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त (Shiva Garjana Yatra) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या आधी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भाजपसह (BJP) शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदम हे वेडे झाले आहेत की काय? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कदम भंपक आहेत. त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी यावेळी बोलताना दिला.

 

देशाची घटना संपवली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जो माणूस आयुष्यभर कुणा खाली वाकला नाही झुकला नाही त्यांनी आपल्यासमोर साक्षात इथे दंडवत घातला होता, असे म्हणत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रत्नागिरीसाठी काय काय केलं याची यादीच भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी वाचून दाखवली. निसर्ग चक्रीवादळ असो किवा तोक्ते वादळ असो प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे रत्नागिरीकरांसाठी धावून आले. पुरापासून कोकण वाचावा म्हणून दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील एकट्या चिपळूनसाठी 3200 कोटी दिले. कोरोनाच्या संकटात 58 कोटी आणि 67 लाख रुपयांची जिल्हापरिषदेची इमारत दिली, असे जाधव यांनी सांगितले.

भास्कर जाधव पुढे म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे तीन वेळा रत्नागिरीत आले.
मात्र, त्यांनी रत्नागिरीकरांसाठी काय दिलं. मुख्यमंत्र्यांनी साडेआठशे कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन केले.
परंतु त्याला आधी मंजुरी उद्धव ठकारे यांनी मुख्यमंत्री असताना दिली आहे.
विनायक राऊत यांचा खासदार निधीचा पाच कोटी रुपयांचा फंड पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गोठवला.
आमचा आमदार फंड दोन कोटी होता, तो अजित पवारांनी (Ajit Pawar) पाच कोटी केल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Bhaskar Jadhav | thackeray group leader bhaskar jadhav has criticized shinde group leader ramdas kadam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का?, शरद पवारांनी स्पष्ट सांगितले…

Nashik Crime News | नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून 12 वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Prakash Ambedkar | ‘कसब्यातील विजय धंगेकरांचा’, प्रकाश आंबेडकरांचे मत (व्हिडिओ)