भाऊ कदम दिसणार ‘लिफ्टमॅन’ च्या भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

‘हवा येऊ द्या या ‘ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेला भाऊ कदम आता आपल्याला लिफ्टमॅन च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ZEE5 या सर्वसमावेशक मनोरंजन प्लॅटफॉर्मने ‘लिफ्टमॅन’ ही मराठी सिच्युएशनल कॉमेडी वेबसीरिज सुरु केली आहे. हि वेबसीरिज आपल्या मूळ कलेक्शनमधून प्रदर्शित केली जाणार आहे. निलेश साबळे निवेदित चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेल्या भालचंद्र (भाऊ) कदमने यात मुख्य भूमिका साकारली आहे.

या सीरिजचं बरंच चित्रीकरण लिफ्टमध्ये झालं असून खाली-वर जाण्याच्या प्रवासात भाऊ आणि त्याच्या वैचित्र्यपूर्ण विनोदबुद्धीचा सामना करावा लागलेली अनेक विविध व्यक्तिमत्व यातून समोर येतात. भरीस भर म्हणजे त्यांच्यासोबत लिफ्टमध्ये असताना लिफ्ट ब्रेक डाउन होऊन अडकून पडण्याची कल्पना त्यामध्ये समावेश केला आहे. भाऊच्या विनोदांचं टायमिंग बघता, खळखळून हसवण्याखेरीज दुसरं काही घडेल असं अपेक्षितच नाही.
[amazon_link asins=’B071JWBFDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4a66e3b2-919d-11e8-91cc-2bf4078c7cb0′]

लिफ्टमनविषयी खुद्द भाऊ कदमनेही आपला अनुभव सर्वांसमोर सांगितला होता. ‘लिफ्टमॅनची संकल्पना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि झी ५ सारखे माध्यमांचे नवीन मार्ग स्वत:ला आपणच अशा कल्पक फॉरमॅट्सकडे कसे घेऊन जातात हे बघून मी प्रफुल्लित झालो. या सीरिजच्या निमित्ताने मी वेबच्या जगात प्रदार्पण करत आहे. प्रवेशासाठी याहून अधिक चांगली संकल्पना मला निवडता आली नसती. स्मार्टफोन आता इतका सहज झाला आहे की, प्रेक्षकांपुढील मनोरंजनाचे पर्यायही हळुहळू बदलत आहेत. आज सर्वकाही शब्दश: एखाद्याच्या हाताच्या बोटांवर आहे आणि अशा परिस्थितीत मागे राहून कसं चालेल?’, असं भाऊ कदम म्हणाला. २६ जुलै रोजी सुरू झालेली ‘लिफ्टमॅन’ ही १० भागांची वेब सीरिज असून, प्रत्येक भाग ८-१० मिनिटांचा असणार आहे. ज्यातून प्रेक्षकांना प्रासंगिक विनोदांनी भरलेल्या गंमतीशीर अनुभव मिळणार आहे.